Total Pageviews

Monday, 18 June 2012

आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....!!!

                    

                 वय वाढायला लागला कि शाहनपण येत म्हणतात..... त्याचीच परिणीती कि काय आजकाल पप्पा बरोबर वाद होतात .......बर्याच विषयावर.....आणि पप्पा तरी हि समजावत असतात  मला त्यांच्या  ५ वर्ष्याच्या मुलीला समजावत होते तसे..... माझा एक मित्र त्याच्या बाबाला एकरी हाक मारतो आणि तिथ  त्याच्या आणि त्याच्या बाबाच्या नात्यातला गहरेपणा समजतो....मग जाणवत आपण पण मारुया का हाक अशीच एकेरी....पण नको माझ्हाय्त आपोआपच येत शहाणपण नको ...माझ्हे पप्पा म्हणन्याच...... माझ प्रेम आहे खर !!!
                                    खरच किती समजून घेतो आपण आपल्या पप्पाला ,बाबाला , तात्याला,आन्नाला ....... आणि असंख्य नाव जी आपण देतो ती ..त्याच त्या आपल्या पित्याला ??????? छे छे ...मी तर इथे अगदीच शून्य आहे ! हे समजून घेण्याच शहाणपण पण अगदी या वाढत्या वायापेक्ष्या ....सरणार्या वेळेकडून किंव्हा शिकवणाऱ्या अनुभावाकडून असेल.... अश्याच कित्ती तरी जणान  साठी असेल हा " fathers day " ज्यांना पप्पाच समजून नाही घेता आला , किंबहुना नाही येत ! ओशाळून जायला होत मग,  आपल तोंड लपवायला अगदी ओंजळ सुधा कमी पडते .... शरम वाटते आप्लीआप्ल्यालाच , गुन्हेगार होतो ...ठार गुन्हेगार.....!!!

पप्पा धरतो पहिल्या पावलाच्या वेळी हाथ ....अगदी स्वताल लागत असताना काद्ठी आधाराला  ....स्साम्भालतो अद्खार्णारी पावलं आणि तीच पावलं आज चालतात ...गावेच्या गावे.... जिल्हे , राज्ये आणि मग उडतात देश देश !!!! तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा सांगतो सायकल स्वतच कशी शिकायची ते, सांभाळत हातातली काठी ......आणि जायचं अंधारातून स्वताच मार्ग शोधात .....! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा देतो हातात गाडी , हुशार माझ्हाय मुलीला ...शाळेत नको वेळ लागायला कि नको जायला अभ्यासातला वेळ म्हणून.....! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, उठवतो पडल्यावर गाडी शिकताना ...सांभाळत स्वताछाच तोल... आणि सांगतो पडलो तरी उठून कसे पुढ चालव ते.....!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, दाखवतो खुर्ची मला, म्हणतो कसा  केला सलाम मी या खुर्चीला आयुष्यभर ....दाखवशील  का बसून यावर  एकदा ?? आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, धरतो हातात दोरी अदृश्य आणि उड म्हणतो आकाश्यात या उंच !!!!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

औरंगाबादच्या सफरीमध्ये पप्पा , म्हणतो कसा मला ..... अशी कशी पडलीस म्हणून हिर्मुस्लीस तू.... केवढा रस्ता हा पडला समोर तुअझ्ह्या ...आकाश हे  तुझच ना?, मग का अशी अड्खालालीस तू.....!!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

अलार्म वाजतो पहाटेच आणि संवाद सुरु होतो  पप्पाचा .....!!आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पैसा कमावताना तो असावा समाधानाचा हे एकता एकता कळत कि ...... सगळी समधानाची पुंजी पाप्पाची गेली आपलं भविष्य घ्दावायला ..... !! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही...

स्वप्न, ध्येय, आणि शिखर दाखवता दाखवता ....आता पप्पा म्हणतो मला कसा कि हो आता स्थिर तुझ्हाय आयुष्यात ..... नाही बघवत हि धगधग आता तुझ्ही...!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

परवा परवा पर्यंत... हाथ धरून चालताना पप्पाचा ...मला वाटल कि मीच पाप्पाची काठी.....!

आणी काल तर ....सगळ कळून चुकलं ........

पायरी उतरताना घराची ....पप्पान दिला हाथ हाथात माझ्हाय , चार बोटांच्या घट्ट पकडीन समजल कि             " माझ्हाच अस्थिव उभ आहे या घट्ट आधारावर !!!!!"

                                                 




7 comments:

swarup said...

मनातलं तू छानपैकी कागदावर आणतेस !!!

Jyoti_Manasvini said...

आज काल आपण स्वतः बरोबर संवादच खूप कमी करो ना????? मला वाटत तो वाढवायला पाहिजे..... म्हणजे मग आपल्या जाव्ल्च्यान्बरोबर संवाद वाढेल......

Aparna Bhagwat. said...

Beautifully expressed Jyoti. Tried to mail a thanks to you for following my blog pan tujha mail address show hot nahi. Anyways, keep writing and thnx once again :).

Jyoti_Manasvini said...

@Aparna Bhagwat........... Thanks a lot...!!!! but no enough mature writting . and i m qt unsatisfy @ it !!! trying to improve!! again thank you !!

Aparna Bhagwat. said...

Jyoti do you have a facebook account? connect with me here www.facebook.com/aparna.bhagwat.189?ref=tn_tnmn

from here you can share my poems easily. I am no good at the settings here.

Shwett said...

Ek number ahe

Jyoti_Manasvini said...

@shwett.........thanks....!!