Total Pageviews

Thursday, 25 April 2013

अनुभव एक स्त्री आहे म्हणून !!!!! (०१ )

                           काही विशेष नाही हे रोजच होणार,  त्याला समोर जाण्यासठी सज्ज असाव एवढाच !!!!! कारण आत्ता हेच बघा न…
                       कालच नाही का मी कराड ला जाण्यासाठी बस ची वाट  पाहत थांबले होते. तोबा गर्दी !! धक्का बुक्क्कीतुन  आत जात एका सीट  वर मला २० - २१ तल्या मुलीन जागा दिली. मी बसतानाच पाहिलं होत कि , तीने  त्या सीट वर आधीच कोणी तरी खिडकीतून ठेवलेली एक पिशवी वरच्या सामानाच्या र्य्यक मध्ये ठेवली होति. तोब्बा गर्दी होति…। माझ्या बाजूला ती खिडकी ला बसली होती तेवढ्यात एक सद्गृहस्थ कदाचित ४० तले असावेत ते…. !!! ते आले, " मला वाटत तुम्ही माझ्या सीट  वर बसला आहत तेंव्हा उठा !" असे ते म्हणाले. तरी हि ती आणि मी काहीच नाही बोललो ननतर त्यांनी आम्हा दोघींना " अहो आज्जी आणि काकू बी उठता का ? असे विचरले. मी इथे पिशवी ठेवली होती पहिली नाही का? चांगली शहाणी सवरती दिसतिएस ग. काळात नाही का तुला ?" असे तो अर्वाच्य भाषेत बोलू लागला. आत्ता मात्र ती मुलगी शांत बसलीच नाही ती स्पष आणि शांत शब्दात म्हणाल्की "काका , तुम्ही गर्दीचा त्रास नको म्हणून पिशवी खिडकीतून ठेवलीत आणि आम्ही गर्दीचा त्रास घेऊन इथे धक्के खात आलोय. मग का उठाव? " यावर काहीही न एकता तो मनुष्य दिरेच्त तिच्या अंगावर धावून आल …।"अ तुझही अक्कल तुझ्या जवळ ठेव आणि तिथून बाजूला हो!!! " हे शब्द कुठल्या माळरानावर किंव्हा उजाड …… आडोश्याला  कोपर्यात किंव्हा बंद खोलीत न्हवते. तिथे तोबा गर्दी होती, खूप पुरुष आणि स्त्रिया होत्या , सरकारी कार्म्चार्यान्पेकी एक conductor  आणि driver  पण होता . असे असताना कोणीच काही बोलले नाही त्या पुरुषाला!!!  अर्थात ती मुलगी म्हणून  कोणी तिची बाजू घ्यावी असा मुर्खासारखा माझा विचार तर आजिबातच न्हवता पण तीच बोलन मला पटल  होत …।तिंच  काय पण मी सुद्धा  त्या गर्दीतून  धक्के खातच आले होते आणि एन तरुणीतल्या  त्या मुलीला आणि मला जर तो पुरुष उपहासाने "आक्का , आजी , काकू " अश्या उपाध्य लावून टिंगल करत असेल आणि इतर कोणी जर काहीच बोलत नसेल  तर काय कराव? आत्ता मात्र मला आणि तिला  गाप्प बसवत न्हव्ते…। "ओ conductor , गाडी कराड डेपो मध्ये घ्या आम्ही विचारतो कि depomaster  ला, तुम्ही काय इथे घरचे जावाई करून ठेवलेत का रोज प्रवास करणार्यांना? " माझ्या तोंडातून एकदम आवाज!!! डोक जाम गरम झ्हाल होत.  आज कराडच काम नाही झ्हाल तरी चालेल पण इथ "कोणी हि या आणि टिकली मारा " हि एका स्त्री बद्दल mentality मी स्वतावर आजिबाअत खपवून घेणार न्हवते !!!! तो पुरुष आहे किंव्हा मी स्त्री हे मला माहित नाही पण एवढ माहित जरूर होत कि मी एक माणूस आहे , एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला selfrespect अजून शिल्लक आहे.
                    तो हि एकदम व्हास कान ओरडला " ओ घ्या गाडी डेपो मध्ये. बघू काय होतंय ते. इथ उठ म्हणून सांगितलं तर उलट बोलायला लागल्यात" अर्थात माझ्या डोक्याच्या शिरा आता मात्रमात्र तट तटायला  लागल्या होत्या. मला हे समजत नाहव्ते कि कोणती एखादी मुलगी किंव्हा बाई उलट बोलली म्हणजे काय याच अघोर ओमान झला कि काय आणि कित्ती वेळचा हा मनुष्य आम्हा दोघींची भर बस मध्ये टिंगल करतोय त्याच काय? काय हि घातीय mentality !!!! चांगला शहाणा शिकलेला दिसत होते…हाह्तातल्या  घड्याळावरून , कपड्यावरून पायातल्या बुटावरून  !!!! आता समजून चुकले होतेच शिक्षण म्हणजे माणूस शहाणा असा होत न्हाई . अर्थात मी "माणूस" हा सह्ब्द स्त्री आणि पुरुष या दोन्ही साठी वापरला आहे. "आम्ही सुद्धा इथे पैसे देऊनच चढलो आहे ." ती एकदम बोलली. तिच्या आवाजात आता धार आली होती. मी तला साथ देणारी स्त्री म्हणून नव्हे तर ती जे बोलली त्या खर्याला साथ देनार तिला कोणीतरी भेटले होत…… !!!! पुढच्या मिनिटाला conductor ने येउव्न त्या माणसाला चांगलाच समज दिला . तरी हो त्याच्या गावाचा stop आल्या नंतर उतरताना आम्हा दोघीकडे पाहून आम्हाला उद्देशून म्हणाला" तुमच्या पिशव्या कधी पुध्ये मागे सापदुदेत , मी direct खिडकीतून बाहेर फेकणार!!!! " आम्ही हसत होतो…… झल्या प्रकारावर नाही तर त्याच्या mentality वर……!!!!  हा आमच्या पुरुष प्रधान समाजाचा एक प्रतिनिधी !!!!
                 अर्थात ,……………… अनुभव चांगलेही आहेत आणि वाईट देखील आणि त्यातलाच एक हा................ जो खूप मनाला दुखावणारा  होता आणि विचार करायला लाव्नारा सुद्धा !!!!  ......................!!!!







2 comments:

Shwett said...

Hahahhah............gud 1

Mahi said...

Very Good...