किती वेळा हातात घेतलं आणि ठेवलं हे पुस्तक ???? पुन्हा "नंदा प्रधान " वर येवून थांबायचे . दीड वर्ष्यापुर्वी सुद्धा इथच येवून थांबले होते. मला सगळ दर्शन व्हायचं "ती" च इथ !! अर्थात साधर्म्य तसा काहीच नसायचा. पण अजीबच "नात" होत "ती"च आणि माझ्ह!!!!
पुण्यात नवं होस्टेल शोधायची धावपळ सुरु होति. तश्यातच एक सापडलं .तीन चार खोल्या , त्यात राहणाऱ्या १० मुली थोड congested होत पण माझ्हाय्साठी मिळाली ती जागा मस्तच होती. जागा आवडली एक्दम. होस्टेल तसे चांगले होते मला हवी तशी एक खोली , दोघींना पुरावी एवढी, मोठ्ठी खिडकी, मागे मस्त झ्हाडी. गाड्यांचा आवाज नाही कि गोंगाट नाही. कुठल्या तरी शेतावरच्या घरात याव अशी आणि याच इमारतीच्या समोरचा भाग इतर इमारतींनी वेढलेला म्हणूनच कि काय माझ्याच खोलीत माझ मन रमायचं. एकदम आवडली जागा आणि लागोलाग समान हलवलं सुद्धा तिथे. बाकी मग सुरु झ्हाल daily work. एक प्रश्न होता अभ्यास करणारी रूम पार्टनर हवी होती. एक आठ दिवसांनी असेल, बारीक शिडशिडीत,थोडी सावळी मुलगी माझ्या कडे आली. बर्याचदा आमने सामने भेट व्हायची पण बोलाव असे काही घडल न्हवत. काही दिवसांनी ती माझ्ही नवी रूम पार्टनर म्हणून आली. जे आली ती आयुष्यभराच नात बनवण्यासाठी!! पहिले काही दिवस आमच तसे शुल्लक म्हणव असे सुद्धा बोलण होत न्हवत .
मला वाटत नात असे भसकन होत नसत किंव्हा ते ठरवून जोडता येत नसत आणि ठरवून तोडता येत नसत. जोडायचं म्हणून जोडलेलं ते नातच ते काय ??? बहुदा हा केवळ योगायोग असतो किंव्हा कदाचित विधिलिखित असाव आपणाला कोणती माणस केंव्हा भेटावीत आणि या प्रवासात ती कुठ पर्यंत यावीत हे. तसंच बहुदा असाव माझ्या आणि "ति" च्या बाबतीत !! एके दिवशी नेहमी प्रमाणे सकाळच्या ५. च्या गाजराला दोघी हि जाग्या झ्हालो . फ्रेश होवून चहाचे पेले हातात घेवून आम्ही आलो. माझ्हाय टेबल वर ठेवलेल्या तिच्या चहाच्या पेल्यात मला काळा चहा दिसला आणि पुढ कित्तेक वेळा कित्तेक दिवस तो दिसत राहिला.दोघी एकमेकिंच्या खाजगी गोष्टीवर बोलाव एवढे जवळ आलो न्हवतो. पण अशीच एक संधी साधून तिच्या उकळणाऱ्या चहाच्या पातेल्यात मी दुध ओतल. हे चहाच दुध आमच्यातल्या दुरावा मिटवण्यासाठी कारणीभूत ठरलं असाव असा मला कायम वाटत. या नंतर काळा चहा कसा औषधी असतो हे सुधा तिच्या.मला होत कि एके संध्याकाळी कंटाळा आल म्हणून अशीच पडून राहिले होते आणि ती आलि. खुश होती हातात दुधाची पिशवि. "ती" च हास्य भलताच लोभस !!!
" काय madam आज अभ्यासल बुट्टी वाटत ?" आज पहिल्यांदा ती मला स्वतहून खुशीत काही तरी बोलली होति. मी चमकलेच.
"कंटाळा लेली आहेस का ? आले मी चहा घेवून दोघींना हि." असे म्हणत ती गेली सुद्धा!!
कोणता वार होता,कोणती तारीख होती , कोणती वेळ होती माहित नाही ती पण त्या वेळेन मला एक निस्वार्थी, निशपाप जिवाभावाची मैत्रीण दिलि.
"चहा पावडर आणि साखर घे माझ्याकडे आहे बघ "…… मी.
मला तिची उद्याची चणचण जाणवली ….पन काही उत्तर नाही आल. direct मसाला चहाच हातात आला माझ्या. अगं , पैसे संपले होते माझे. दूध कुठून आणणार? चहाच्या कपात पाहत ती बोललि.
"आग मग घ्याचा न माझ्या कडून " …
" नाही ग कश्या ला???? आपली परिस्थिती आपल्या बरोबर. आणि तशी तू नवीनच न ग. उगाच कश्याला तुला त्रास्स.??
" मग मी रोज चहा घेईन हा सांगते?"
" हो!! रोज घे. पण दुध असेन तेंव्हाच देवू शकेन मी" हे वाक्य मात्र खोट हसन मिसळून दिल होत मला तिन. त्या दिवशी एक रिकामा कप हातातून बाजूला ठेवला आणि मला जाणवलं एक पुस्तकच हातात पडल होत माझ्हाय. बराच गप्पा झ्हाल्या. हळू हळू सगळा उलगडा व्हायला लागला. तिला माझ्यात आणि मला तिच्यात "मैत्र" या शब्दाबद्दल विश्वास जाणवायला लागला आणि मला एक हक्काची मैत्रीण मिळाली . पुढ एकमेकीला बिनधास्त जागा मिळाली मनातले विचार share करायला ….त्या हि पुढे share कारण मग पडल मग मात्र मैत्रीचे घट्ट धागे जुळायला लगले. पुढे आम्ही २.५ वर्षे एकत्र होतो कधी वाद झ्हाल्याच आठवत नाही. "ती" म्हंजे एक भन्नाटच होति. माझ्हाय मेंदूच्या कुवती बहेरचि. इतिहास पदवीधर असणर्या या बहाधार्नीची MCM नावाची Computer Science मधली Masters degree चालू होति.
एक पुस्तक उलगडाव तशी तिच गतं आयुष्य उलगडत गेल माझ्या समोर . प्रेमात धिक्कारली गेलेली, खंगलेल्या आईबाबा ला बघून खूप अस्वथ होणारी "ती". पुण्यासारख्या व्यवहारी शहरामध्ये आलेली हि भावूक मुलगी हळू हळू कठोर, भावना शुन्य आणि व्यवहारी होताना मी पहिली. वेळ खूप शिकवत जाते असे आपण म्हणतो पण खरच किती लोक शिकतात या वेळेपासून ???? म्हणून 'आपप्न खूप शिकत जातो' हे अधिक महत्वाच . "ती" ला जे जे वेळेन शिकवलं ते ते तीन डोळ्यातून टिपूस हि न काढता पचवल. कित्तेक दा डब्याला पैसे नाहीत असे म्हंटल्यावर Maggie , बटाटे, पोहे अश्यावर दिवस ढकलले. एवढ्या चांगल्या होस्टेल मध्ये राहण्याचं कारण एकाच कि इकडून तिकडून उधारी करून घरातल्यांनी मिळवून दिलेल्या Computer ची इथे राखण होणार होति. नाही तर कुठ ठेवलं असत तिन हे समान??????
तिच्या पद्व्युतार काळात आम्ही भेटलो, आणि मी एका संघर्ष्याची साक्षीदार झ्हाले . सकाळी लवकर उठाव दुध, चहा करून college गाठावं. अर्ध्यातासाच्या सुट्टीत फक्त २ चपात्या आणि भाजी चा डब्बा रूम वर येतो म्हणून चालत याव , पुन्हा संध्याकाळी ४ ला याव आणि पुन्हा ८. पर्यंत job करावा आणि पुन्हा येवून अभ्यस हा तिचा दिनक्रमच होत. छोट्या pouch मध्ये पैसे नसतिल तर काळा चहा घेणारी ती आज ३५०० रुपयाच घड्य्याल मनगटावर घालून फिरते या वर विश्वास नाही बसत. आई बाबा , विधवा बहिण यांच्या बद्दल हळवी असणरी "ती", शहरी वातावरणात मिसळू पाहणारी पण "गावाकडची" म्हणून हिणवली गेलेली "ती" मी पहिली आणि फक्त बघ्याच्या भूमिकेत असताना मला भन्नाट बदल दिसले तिच्यात. सध्या कपड्यात वावरत असताना आजूबाजूच्या वातावरणान तिला शिकवलं इथ जर पाय रोवून राहायचं असेल तर इथलाच व्हाव लागेल आधी. हळू हळू तीन स्वत समजून उमजून असे बदल राहणीमान , बोलण या सगळ्यावरच ती खूप विचार करायची आणि मी थक्क व्हयचे. हळू हळू आमच्यात मैत्री घट्ट व्हायला लागली. दोघी हि एक-मेकीच्या सुख दुखाचे साक्षीदार होतो. पुढ पुढ तर एकमेकींना काही न सांगत राहील असाव असा शक्यच न्व्हत. माझ्हाय आयुष्यात माझ्या आई पप्पान ननतर च एकमेव जवळच नात होत हे आणि आज हि आहे हे!! कोणी विचाराल मला कि "आळीच फुल्पखारातल रुपांतर पाहिलं आहेस का?" तर मी म्हणेन खरच हो. ते इथच पाहिलं होत. हळू हळू धाडशी होत जाणारी, आजूबाजूला चमचम जग असताना पै आणि पै चा हिशोब ठेवून धाडसान पावलं टाकणारी मुलगी मी पहिलिय. तिच MCM करण त्यानंतर पुढ जाण्यासाठी वेगवेगळ्या courses ची माहिती घेण. त्यासाठी पैशाची जुळवाजुळव हे सगळ मी बघतच होते. हे घडत असताना मला एक जाणवलं कि कोणत्यातरी ठाम विश्वासावर पावलं टाकायची. तिच्याशी बोलताना मात्र तिचे सगळे प्रश्न जाणवायचे हळवेपणा,अपमानाने दुखावलेली, कोणीतरी ढकलून देत हि भावना सारखी तिच्या मनात डोकावायची. पैश्याच्या चनचनिवर मात करायला ती data entry सारखी काम करत होती हे जेंव्हा मला समजले तेंव्हा तर मी थक्कच झ्हाले होते . माझ्हाय चांगल्या - वाईट वेळेमध्ये मध्ये ती साक्षीदार होति. ती माझ्ही भरभक्कम विश्वासाची जागा होती आणि आज हि अहे.कित्तेक वेळा ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आम्ही मूक पणे बसलो असायचो आणि त्या मौनाच्या वेळेत सुधा संवाद चाललेला असायचा. कित्तेक वेळा रूम मध्ये चार चार दिवस बोलणच व्हायचं नाही आम्ही दोघी हि दोघींच्या आपल्या प्रश्नांच्या tension मध्ये असायचो पण समजून जायचं सार काही . वेगळीच वेळ होती ती !!!! मी एकीकडून कोलमडत असताना, "ती" मात्र भक्कम आधार देवून असयचि मला. स्वताला सावरत सावरत मला हि सावरायची!!!! पण वेळ स्थिर नसते. कालांतराने नोकरी निम्मित आम्ही दोघी हि दुरवलो. मध्ये मध्ये phone वर संपर्क असायचा . जवळपास एक वर्ष्या नंतर जेंव्हा तिला भेटले तेंव्हा एका "software company " मध्ये काम करणारी "ती" मला भेटली. माणूस स्वताला बदलवू शकतो म्हणजे किती ???? याला जश्या काही सीमा नाहीत तशी "ती" माझ्यासमोर !!!!!सीमांच्या हि पुढा जाऊ पाहणारी !!!!!
मला आठवत असे , पानझडी च्या ऋतूमध्ये आमच्या खिडकी मागच्या वेली गळून पडल्या . रूम मध्ये खूप उन यायला लागल , पडदा ओढला गेला. किती दिवस तो असाच सकाळी सकाळी ओढला जायचं आणि संध्याकाळी खुला व्हयच. आणि एके दिवशी मात्र आम्ही पडदा ओढलाच नाही वेलीं वर बारीक बारीक बोटभर लांबडी कोवळी पान आली होति. सगळा प्रकाश त्या कोवळ्या पानावरून रूम मध्ये येत होत. पोपटी रंगाचा खूप चं प्रकाश रूमभर पसरला होत. जुन्या पानांना साठलेल्या माती सहित निसर्गान वाहून नेल होत. आत्ता मस्त कोवळा प्रकाश आणि नवी पालवी आली होति. तशीच नवी पालवी ती न सुधा ओल्धून घेतली होति. हव असलेल आर्थिक स्वावलंबन तिन मिळवलेल होत. स्त्री किंव्हा बाई किंव्हा मुलगी म्हटलं कि "लग्न" हेच शेवट समजल जात पण या हि पलीकडे स्वतच नाव आणि अस्तित्व याची जाणीव तिला झ्हाली होति.
आज पुन्हा "नंदा प्रधान" वाचताना मला "ती"न दिलेल्या पहिल्या payment नंतर ची party आठवली. मन एकदम "ती"च्या आठवनीन मध्ये गेल, खर तर technology च्या युगात संपर्क साधन कठीण नाही, पण शांत पणे बसून बोलण आणि थोडा वेळ न बोलत मुक्यान घालवण आणि आपल्या या "मैत्र" ला समजून घेण जमेल का पुन्हा?????? मी वाट पाहतेय तिच्या दुसर्या party ची !!!!!!!!

4 comments:
Jyoti.. khup chan lihile ahes... keep it up.... Kirti Tembe
Jyoti.. Khup chan lihile ahes..... I'd say this one is best so far... Keep it up...
Jyoti... khup chan lihile ahes... I'd say this one is best so far... Keep it up... Kirti Tembe
ekadam sahi mam i like it.....
Post a Comment