हिलाल पुस्तक उघडल्यावर अगदी अनुक्रमणिकेच्या आधी च महात्मा फुलेंचा वाक्य आहे. तिथेच थोडासा अंदाज येतो. धर्माच्या जोखडात अडकलेल्या समाजावर काही तरी आहे. आठ कथा आपल्याला आपल्या समाजाच्या एका विशिष्ट स्तरामधले लोक कुठे कसे भरडले जातात या वर प्रकाश टाकतात. खरं तर हे वाक्य थोडं कृत्रिमच वाटतंय. पण यामध्ये त्यांनी कुठे हि टीका किंव्हा विचार असे नाही मांडले. फक्त एक एक कथा लिहीत त्यांनी यावर आपल्यायाच विचार करायला भाग पडलं आहे. प्रलिखाणामध्ये कुठे हि कृत्रिमपणा नाही, कारण खान यांनी अगदी स्वतः हे जवळून पाहिलंय प्रत्येक भाव टिपलेत आणि त्यांना शब्दबंध केलाय असा वाटत राहत. भावना, राग, हताशपणा यांना योग्य शशबदामद्ये बांधून ठेवलाय. प्रत्येक कथा वाचताना त्या कथेचा गाभा हळुवार पाने उलगडून आपल्या हृदयात थोडी का होईना कालवाकालव करून लेखक कथा थांबवतो . ना काळातच आपण त्या त्या कथेला घेऊन विचार करू लागतो जे काही झ्हाल ते का?? कारण काय असेल बरं ? खरंच गरिबी, अंधश्रद्धा कि शिक्षिक्षण नसणे हि कारण आहेत का ?? समाज कोणता हि असू देत, जाती धर्म कोणता हि असू देत पण बळी पडणारा, होरपळणारा हा माणूसच असतो हे मात्र नक्की!!!
"बांगी " मधला बद्रुद्दीन देवाच्या आणि लोकांच्यामधला दुवा बनण्याचं काम करता करत स्वतःच्या केलेल्या पपांना आठवत आठवत मरण पावतो.
"मन्नत " मधली हतबल चाची समाजतल्या गरिबीचे बळी कसे पडतात याची उदाहरण आहेत. समाज, धर्म आणि अंधश्रद्धा यामध्ये आहारी गेलेले तीन निष्पप जीव.
"मुराद" मधली मेहरु वाचली आणि मला पेपर मध्ये येणारी किती तरी बाळ लैंगिक शोषणाची उदाहरण डोळ्यासमोर आली. किती तरी धार्मिक ठिकाणी मग ती कोणत्या हि धर्माची असोत अश्या घटना घडल्या आणि त्या घडे पर्यंत वेळ का आली याच वोइचार करायचं कोणत्याच धर्म मध्ये आणि समाजामध्ये धाडस नाही कारण आपण गेलोच आहोत इतके आहारी, याच प्रतिबिंब या कुठे मध्ये आहे.
" सवाल" मधला मास्तर स्वतः एक शिक्षक असूनसुद्धा स्वतःच्या दमा झ्हालेल्या मुलाला दवाखान्यात ना नेता अंधश्रध्येला बाली देतो. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
" ईद " मधली आशाबी गरिबीची आणि पुरुषप्रधान समाजाची बळी. पाच मुलांची पोट स्वतः उपाशी राहून भरणारी आशाबी !!! तिला मुंग्यांबद्दल खूप हेवा वाटतो, का तर परमेश्वर मुंग्यांना सुद्धा उपाशी ठेवत नाही, तेंव्हा तीच भाबड मन म्हणत कश्या राहतील मुंग्या उपाशी असतंच किती असा त्यांना पोट ?? माणसाचं पोट मोठ्ठ म्हणून माणसाला ते भरायला दिवसभर राबवा लागत.
"आलमा" मधली आलम स्वतःच्या तरुण मुलाला मानसिक धक्यातून बहर घ्यायच्या प्रयत्न करता करत अंधश्रध्ये मध्ये बाली देते. वाचकाला मात्र माहित असत कि फकिरांची बुवाबाजी उघड करणाऱ्या सौद च्या मारेकऱ्यांचा तो एकच साक्षीदार असतो आणि त्यासाठीच त्याचा बाली दिला जातो !!!
" पिवळट लुगडं मळकट पिशवी" मधला सादिक गरिबी मूळ आई ला आणि आपसूकच बालपण ला गमावून बसलेला. राजन खान यांनी बाळ मनाच्या भावना इतक्या हळुवार पणे जिवंत करून मांडल्या आहेत कि त्या कोवळ्या मुलाच्या येतं आपल्याला आपल्या हृदयात जाणवतात.
" पिवळट लुगडं मळकट पिशवी" मधला सादिक गरिबी मूळ आई ला आणि आपसूकच बालपण ला गमावून बसलेला. राजन खान यांनी बाळ मनाच्या भावना इतक्या हळुवार पणे जिवंत करून मांडल्या आहेत कि त्या कोवळ्या मुलाच्या येतं आपल्याला आपल्या हृदयात जाणवतात.
या सगळ्या कथा आपल्या समोर प्रत्येक समाजच, प्रत्येक जाती धर्ममधल्या बुवाबाजी यावर प्रकाश टाकून जातात. गरिबी वाईट कि अशिक्षित पण कि आणखी काय याच उत्तर काढताच येत नाही !!! प्रश्न अनुत्तरीतच राहून प्रत्येक कथा संपते आणि आपण मात्र त्यावर विचार करत राहतो !!!



No comments:
Post a Comment