आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??
आधीचि कोवळी मने आता संसाराच्या धावपळीत सावरली आहेत....
आजूबाजूची नाती सांभाळत एकमेकांची मन सांभाळायला शिकलोय .....
कारण,
आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??
उगाच दिखाव्याच्या भपकेबाज पणाच्या ऐवजी....
शांत हातात हात घालून बसंण जास्तच छान वाटतंय ...
आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??
बोचरे शब्द आणि नकोशी स्पष्टीकरण हळू हळू कमी झ्हाली आहेत ..
शाब्दिक आघात आणि खट्टू झ्हालेलं मन सगळं कस हळू हळू विरून गेलय .....
आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??
दिवसांमधला एक असाच एक call,
आणि बिन शब्दाचा संवाद , हळू हळू समजायला लागला आहे...
कारण, आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??
एकमेकांची स्वप्न,
एक परीघ
आणि गालावर पापी देणार एक फुल आहे हे हळूहळू समजायला लागलं आहे
कारण आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??