आजूबाजूला खूप काही घडत असत कधी कधी आपण नुसतेच बघत असतो आणि कधी कधी खूप खूप चांगली उदाहरण सकारात्मक काही तरी शिकवून जातात आणि कधी कधी हे असलं नसायला पाहिजे किंव्हा मी हे कटाक्षाने जाणीवपूर्वक भविष्यात टाळेन असा काही शिकवून जातात. अश्याच तीन कहाण्या मी इथे लिहिल्या आहेत. कुठे शिकवण नाही फक्त निरीक्षण !!! काय शिकायचं आणि काय नाही हे आपण ठरवायचं !!!
५.०० च्या गजराने थोडीशी जाग आली, किती वेळ घड्याळ वाजत राहील माहित नाही पण थोड्याच वेळात घड्याळाचा आवाज मात्र बंद झ्हाला . डोळे मिटून झोप घ्यावी असा विचार हळूच येणार तेव्हड्यात," आगा उठ किती वेळ झोपतेस. गेल्या दोन महिन्यात आजिबात कंसिस्टंटली केला नाहीस व्यायाम. मी निघालोय ऊठ !!!" नवरा जिम चे कपडे घालून पाण्याची बाटली आणि रुमाल हातात घेऊन बोलत होता, आणि उठे पर्यंत गेला सुद्धा !!! .......
तर कहाणी नंबर एक !!! पुण्यात प्रोजेक्ट च्या कामासाठी तीन चार महिने थांबले होते म्हणजे ये जा आणि थांबणं झ्हाल. मी रोज आल्याचा चहा प्यायला हॉटेल समोरच्या टेम्पोवजा टी स्टॉल वर जायचे. ४५-५० च्या आजीबाई आणि त्यांच्याहून वयस्कर आजोबा तो चालवायचे. चार महिन्यात माझी आणि त्यांची बऱयापैकी ओळख झ्हाली. त्यांनी तो स्टॉल ५ वर्ष्यापुर्वी सुरु केला म्हणजे अर्थात नवऱ्याची नोकरी थांबली आणि मुलग्यांच्या पगाराववर घरात तंगी होऊ लागली आणि आत्ता हाच चहा चा स्टॉल जे माझं आधीपासून स्वप्न होत तो कसा घराला सर्नपेक्षा जास्त हातभार कवतो हे सांगताना त्यांना अभिमान वाटत होता. अर्थात मग प्रश्न पुन्हा आला कि मग आधी का नाही केला सुरु?? य माझ्या प्रश्नवर आजी च्या बोलण्यातून नाराजी, नवर्यावरचा राज आणि गेलेल्या वेळेची खंत दिसून आली. "मूळ जरा मोठी झ्हाली आणि शाळेला जाऊलागली तेंव्हाच हे करायचं म्हणत होते मी. पण लोक नातेवाईक काय म्हणतील म्हणून अडलं सगळं. आणि जसा पैसे कमी पडला दवाखाने आले तसे कोण नाही माझा चहाचा गडाचं कामाला आला. आमचा माणूस शान नव्हता हो, तेंव्हाच चार पैसे जोडले असते मी तर मुलांना शिकायला मदत झ्हाली असती, काही तरी चांगलं जहाल असतंच कि !! पण माणसं एकल नाही बघा. आता ५५ वर्ष्याची आहे मी. मुलापेक्षा आणि सुने पेक्ष्या जास्त कमावते. आणि मुलाला आणि सुनेलाही अभिमान वाटो हो. सगळे मदत करतात मला. आजोबा ना नाही जमत सगळं पण प्लेट देणं पैसे घेणं पाणी देणं हे तर करतात ते. टेम्पो आजोबाच चालवतात . मुलगा सगळं सामना गाडीमध्ये भरू लागतो, पाणि भरून देतो. सून घर सांभाळते आणि classes हि घेते. मी तिला म्हटलं मला ५०व्य वर्ष्याची वाट पाहावी लागली माझा पैसे कमवायला तू तुला काय सुरु करू वाटत ते तर. हे सुरु करावं असा खूप आधी पासून वाटत होतं. आता मनासारखं करतेय ना थकवा येत नाही. हिंजेवाडीला जाणारी सगळी IT ची मुलं मुली येतात माझ्या इथे. आवर्जून सांगतात सकाळी लवकर या कि आजी आम्ही वाट पाहत उभे असतो इथे. माझं सगळं स्वछ असत आणि गरम गरम देते मी त्यांना त्यांची आई देते तसं." खरं होत त्यांचं या जगात मनासारखं काम आणि कामातून मिळणार समाधान हेच हवं असत प्रत्येकाला. मी शुभेच्या देऊन तिथून निघाले. पूण सोडताना सुद्धा त्यांना भेटले, किती तरी वेळा त्यांच्यावर विचार करत राहिले. at लीस्ट वयाच्या ५५ व्या वर्षी स्वतःला जे आधी करायचं होत ते ती बाई करतेय समाजाचा विचार ना करता. या सगळ्याचा आत्मविस्वास आणि अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर होताच !!!
कहाणी क्रं दोन !!!! मी दोहा ला शिफ्ट झ्हाले. वर्षयभर नोकरी झ्हाल्यावर, मुलाच्या जन्मानंतर थोडे दिवस घरी थांबणं आलं. त्या वेळेत माझ्या माझ्याच बिल्डिंग मधल्या चित्रा बरोबर ओळख झ्हाली तिला दोन जुळी मुले. ती हि ३-३. वर्ष्याची !!! पेशाने दोघे हि अभियंते. बोलता बोलता ती म्हणाली दोघांना पाहता पाहता खूप धावपळ होते. पण त्यातूनही मी वोर्कशॉप्स आणि सेमिनार्स अटेंड करते. मला धक्काच होता हे कास जमत तुला हा माझा सरळ आणि प्रामाणिक प्रश्न होता तिला. तीच उत्तर ऐकल्यावर मी चाट पडले. ती म्हणाली नवरा सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन कणिक मळतो, चहा ठेवतो मग मला उठवतो. मग मी नाश्ता आणि भाजी चपाती बनवते.अम्मच जेवण ७.३० लाच होत. मी रात्री भांडी धुवून पुसून ठेवते. सेमिनार, वोर्कशॉप आणि इंतेरवीदेव यांच्यावर काही ना काही काम करून झोपायला मला ११ होतात आणि हे मुले रात्री अपरात्री उठता. कोणाला खोकला तर कोणाला सर्दी." मी भारीच ग !!! नवऱ्याची मदत म्हणजे आणखी काय पाहिजे तुला ??? पण या माझ्या reaction वर माझ्यामालाच तिच्या उत्तराने लाज वाटली. ती म्हणाली ," शिक्षण अगदी B A असू देत किंव्हा MBBS प्रत्येकाकडे स्वतःला घडवावं एवढी कॅपॅसिटी असते. आपलं शिक्षण सारखं, पगार घ्यायची क्षमता सारखी मग आपण चपाती केली किंव्हा जेवण केलं तर ते रेग्युलरच आणि पैसे कमावले म्हणजे स्पेसिअल का म्हणायचं. तसाच पुरुषानं कणिक माळली तर ते special का समजायचं ? मी आई झ्हाले म्हणून मी दोन पावलं मग घेतली, माझी कामे थांबली माझा अनुभव घेणं थांबलं माझा आत्मविश्वासावर सावट आलं ते एक पिता म्ह्नणून आलं का त्याला. तर असू देत हे सगळं चालणारच घर म्हंटल कि !!! and yes, i am agree with you!! when women come forward for sacrificing something from her side then men must have to come forward for sacrificing for thr ego !!! घर हे असाच एकमेकाला वर ओढून घेण्यातूनच चालत असावं नाही का? नाही तर मग, स्वतःची स्वप्न बुडताना पाहून कितीतरी काळवंडलेली आणि पडलेली तोंड मी पहिली आहेत.
कहाणी क्रमांक तीन वर विचार करतानाच मला माझं station आल्याची announcement ऐकू आली. मी पुढच्या कहाणीच्या शब्दांना मनातल्या मनात बांधत चालत घरापर्यंत पोहोचले. किल्ली काढायला हात पर्स कडे तेवढ्यात घरातून कुकर च्या शिट्टीचा आवाज आला. आता चहा घेऊन झ्हातकं स्वपकाला लागलं पाहिजे. अगदी ना थांबता, कारण माझा पार्टनर न थांबता आल्याआल्या कमला लागला होता. आमी दीक्षित आणि दिवेकर नाही पळू शकत पण रेअसत ८.३० ची वेळ तरी पळू शकतो ना!!! कारण सर्वांनाच लवकर उठून धावायचं असत !!!!
"एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ !!!"
-------- मनस्विनी !!!