Total Pageviews

Saturday, 5 October 2013

यंदाची नवरात्र : जागृती अंतरंगातल्या दुर्गेची …… !!!!!!!!!!!



                                                    " नवरात्र " ……… घटाची स्थापना  करायची ……… फुल आणावी लागतील . आपली हि वैवाहिक आयुष्यातली  ची पहिली नवरात्र !!!!! पण का करतो आपण नवरात्र ?????? फक्त देवीचीच पूजा का??? समाजात  तर असा काही दिसत नाही "स्त्री शक्ती" "स्त्री लक्ष्मि" "स्त्री सरस्वती" तरी पण रोज एक्तोच कि भयाण घटना !!! जर संस्कृतीच पाळायची तर सर्वाथार्ण कुठ पाळली जातेय हि संस्कृती ?????? माझ्या मनात प्रश्नाचं  विणलेल जाळ  आणि त्यात अडक्लीली मी …….!!!! या विचारात मी अंथरुणावर पाठ टेकली. 

                     रात्र गहन झलेली , मी स्वतालाच पाहत होते, एका मोत्यःस्या टेकडीकडे चालत जाताना. भल मोठ्ठा मंदिर दिसत होत , ब्र्यापाकी नुसत्या दिव्यांचा प्रकाश बाहेर जणवत होत…….  कोणत्या देवाच  असाव बर ???? विचार करत करतच मी आत पोहोचले…. !!!! भल  मोठ्ठ मंदिर , बायकांचा ताफा च्या ताफा पूजेला बसलेला , काळोखात फक्त दिव्यांच्या ज्योती तेवत होत्या आणि  मनात पुन्हा तेच विचार सुरु होते  "घट  बसवायचा आणि घटस्थापना करायची ……. फुल आणायची……………. माळा  ओवायाच्या  … देवीची पूजा मांडायची …….!!!!!!!!!!  " पण एक मन म्हणत होत का मांडायचा घट, का करायची दुर्गेची पूजा ……. ??????  कुठली दुर्गा , कुठली सरस्वती आणि कुठली पार्वती???????  सगळ्या नुसत्या आमच्या संस्कृतीमध्ये  मध्ये पुजलेल्या आणि रोजच्या आयुष्यात पावला गणिक , चोरासारखी  नजर घेवून , दबक्या पावलान जीवाच्या आकांतान भटकणार्या !!!! कधी जातात  हुंडा बळी म्हणून आगीच्या भक्ष्य  स्थानी कि कधी जातात  रस्त्याच्या कडेला स्वताच शील हरवून आणि अस्तित्वाला यायच्या आधीच जातात गर्भात मरून  !!!!!! मग का बसवायचा घट  , का करायची घटस्थापना?? 
                       
                  एवढ्या भयानक चीड असलेल्या प्रश्नांना घेवून मी गाभारयत आले आणि  थरकाप्च उडाला …। काळी मतेच मान्न्दीर  !!!!!!!! केवढी मोठ्ठी हि मूर्ती आधी भीतीच वाटली काय दबदबा आहे या आई चा?????  उगाच कां  घालात असतील देव सुधा लोटांगण तिला?????

 "बये दार उघड , बये जागी हो…… माज माजलाय समाजात ……. बये शैतानाची डोकी गळ्यात अडकवून ये… बये हाताथ खड्ग घेवून ये…" 

या कोण बायका … एवढ्या आर्जवान का काळी माते ला साकड घालताहेत ??? चल आपण पण जावू , बोलावू तिला.…… 

"ये ग माझ्या शिलाच्या  रक्षणाला … माझ स्त्रीत्व धोक्यात आलाय , ते जातंय गर्भातच खुडून , जातंय रस्त्याला क्षीण होवून , पावूल टाकेल तिथ दिसतात भयाण स्वापद , भयान  नुसती गाळण उडतेय ग  आई . !!!! दार उघड आणि ये……. जागी हो आणि ये…… हातही खड्ग घेवून ये…… "

" जागी हो ग बये जागी हो …,रनचन्दिके जागी हो……।   , मर्दिनी जागी हो……. , काळी मते जागी हो……. " 

आणि हे काय कसल्या या विजा चमकताहेत , कसलं हे वादळ , या घंटांचा निनाद …???????  आणि काळी काळी रक्ताळलेली हि भली मोठ्ठी कोण …. ????????  

अर्रे , हिला काय घबरयच… हि तर माझही आईइ ………… आली आली आईइ !!! रक्षणाला आली माझ्ही आई  , हाथी  घेवून  त्रिशूल आणि खड्ग … रक्त प्यायला आली नराधमांच …… माझही आई … !!!!! 

भवानीचा उदो उदो ,…… रंचादिकेचा उदो उदो …… मा काली चा  उदो उदो…। 

बये न दार उघडल , बये न दार उघडल ……. 

???? पण प्रश्न काही केल्या सुतेन…. " पण आई , अशी का ग तू आक्राळ विक्राळ ? तुझ्या लेकी आल्या दारी आणि का ग तू तप्त आशी ????"

आईच ती मनातला प्रश्न तिला समजला ………… आणि तो मला जाणवला . । आता माझ्हाय शी बोलेल प्रेमान , बसेल जवळ आणि करेल सांत्वन , एकेल माझ्ही व्यथा  आणि फिरवेल हाथ डोक्यावरून …. मग पडेल माझ्या डोळ्यातून पाणी आणि टेकेन तिच्या खांद्यावर माथा मी !!!!. "

पण छे , छे  काही तरी विचित्र घडतंय  , तिचे डोळे एखाद्या राक्षसाच रक्त प्यावेत इतके लाल लाले लाल !!!! हे  खड्ग काय मलाच मारायला आणल कि काय तिन…? 

ती कडाडली, " आग मूढमती माझ्हाय लेकिंनो , जगाची स्तःपणा करून जन्माला घातला तुम्हाला इथ समतोल साधायला !!! आणि मला च "दार उघड बये ,दार उघड बये" म्हणताय . मी जागीच आहे. मूढमती झ्लीये तुमची !!!!  अस्तित्वच भान हरवाय तुमच्या !!! वैचारिकता लयाला गेलीय आणि माझ्हाय दारात याचना करायला आलात तुम्ही ??? तुम्हाला हेच शिकवून माझ्हाय गर्भातून पाठवलं होतात का? उत्तर द्या????? "

आता काय म्हणव, छे , छे  !!!!! दिल होतास तू आत्म भान , शक्ती तेजाची आणि अंश तुझ्हा  माझ्या  हृदये  !!!!!! 

या उत्तरावर ती दुप्पट कडाडली  " कशी झाली  दैना  हि अशी दुर्गेची, कशी जाते पावलो पावली सती अग्नीच्य भक्षी, कोणी केला अपमान तिच्या स्वाभिमाना चा ???? समाजच मुळात आला तुझ्या गर्भातून मग इतका माज कसा चढला ?????? शिकवण दिलीस कि नाही समतेची, समानतेची , विवेक्शिल्तेची ????"  

घाबरत घाबरत आवाज निघाला " हो  , हो !!! सगळ तर लिहील त्या मनुन , संस्कार आणि संस्कीतीच्या नवान एक अलिखित नियम आम्ही पाळतो, नंतर नम्रतेची शाल ओढून  दुय्यम जागा स्वीकारतो !!! पाणी भरतो रंध ,काढतो  मुल जन्माला घालतो , गुर ढोर सारख रबतो…अगदी खर सांगू का तुला ……। रस्त्यावाच्या वासनेला जातो आम्ही बळी , बाजारात विकलो सुधा जातो आम्ही !!!!!   पण आई काय करू ग. आत्ता नाही सहन होत हा जाच . आता मुळी  स्त्री चा जन्मच नाकोगा बाई …!!! हव तर येते जन्माला तुझ्या खड्ग खालच्या  राक्षाच्या !!!! पण आता स्त्री धर्म वैगेरे नको बाई ……. !!!!!!!" 

……………आकाश कोसालाल कि काय, डोळ्यातून तिच्या आग येतेय कि कय…… मी भस्म होतेय कि काय …… ??????

"अग मूढ माती , पळून काय जातेस अशी??? तू लेक महिषासुर मार्दीनीची !!!! तू लेक काली ची … आणि भ्याड अशी तू मरगळलेली ????? शोध  हहृदयातल्या दुर्गेला,  जागी कर काली  ला !!!! आधी शोभ तुझ्यातल्या "स्व" ला !!!! तूच आहेस शत्रू तुझ्हायचं अस्तित्वाची !!!! विचार प्रश्न तुझ्या मनाला  देतेस काय शिकवण तू तुझ्या पुढच्या पिढीला??? शिकवतेस का आदर स्त्रीचा , तिच्या स्त्रीत्वाचा, तुझ्याच विचारात आहे का समानता??????? आहेस तूच घसरून तळागाळात रुतलेली आणि ठेवलास स्वतला तिथच फसवून . निर्मितीच कार्य दिल मी तुझ्या हातही आणि कसल्या समाजाची केलीस हि निर्मिती???? तूच जालातेस लीभापाई एका स्त्रीला , आदर नाही स्त्रीत्वाचा तुझ्याच मनी आणि आलीस माझ्या दारी?????????" 

                           आणि तत्क्षणी तीखादाग माझ्या छातीला छेडून गेल …। माझ्यात  तिच  अस्तित्व जाणवलं …। ती वसते माझ्या मनी, माझ्या ह्रिदयी , म्हणून तर ती म्हणते मला ……. 

शोध आधी माझ्या अस्तित्वाला 

जे आहे तुझ्या ह्रीदाई !!!! 

मी नाही यायची रोजच्या घडी 

लढाई हि तुझ्ही 

तूच लढ बाई 

जनमताच दिला माझा अंश तुझ्या थाई 

कसली ग भीती हि तुझ्या मनी??????

                         खट  कन जाग आली किती ब्वाजले ??? कुठली वेळ माहित नाही …… माझ्यासाठी "ब्रम्ह-मुहूर्त " !!!! या वेळे ची नवरात्र "अंतरंगातल्या "दुर्गेच आवाहन" !!!! तिलाच घालाच साकड !!!! तिलाच ठेवायची जागी सदासर्वकाळ !!!