Total Pageviews

Saturday, 5 October 2013

यंदाची नवरात्र : जागृती अंतरंगातल्या दुर्गेची …… !!!!!!!!!!!



                                                    " नवरात्र " ……… घटाची स्थापना  करायची ……… फुल आणावी लागतील . आपली हि वैवाहिक आयुष्यातली  ची पहिली नवरात्र !!!!! पण का करतो आपण नवरात्र ?????? फक्त देवीचीच पूजा का??? समाजात  तर असा काही दिसत नाही "स्त्री शक्ती" "स्त्री लक्ष्मि" "स्त्री सरस्वती" तरी पण रोज एक्तोच कि भयाण घटना !!! जर संस्कृतीच पाळायची तर सर्वाथार्ण कुठ पाळली जातेय हि संस्कृती ?????? माझ्या मनात प्रश्नाचं  विणलेल जाळ  आणि त्यात अडक्लीली मी …….!!!! या विचारात मी अंथरुणावर पाठ टेकली. 

                     रात्र गहन झलेली , मी स्वतालाच पाहत होते, एका मोत्यःस्या टेकडीकडे चालत जाताना. भल मोठ्ठा मंदिर दिसत होत , ब्र्यापाकी नुसत्या दिव्यांचा प्रकाश बाहेर जणवत होत…….  कोणत्या देवाच  असाव बर ???? विचार करत करतच मी आत पोहोचले…. !!!! भल  मोठ्ठ मंदिर , बायकांचा ताफा च्या ताफा पूजेला बसलेला , काळोखात फक्त दिव्यांच्या ज्योती तेवत होत्या आणि  मनात पुन्हा तेच विचार सुरु होते  "घट  बसवायचा आणि घटस्थापना करायची ……. फुल आणायची……………. माळा  ओवायाच्या  … देवीची पूजा मांडायची …….!!!!!!!!!!  " पण एक मन म्हणत होत का मांडायचा घट, का करायची दुर्गेची पूजा ……. ??????  कुठली दुर्गा , कुठली सरस्वती आणि कुठली पार्वती???????  सगळ्या नुसत्या आमच्या संस्कृतीमध्ये  मध्ये पुजलेल्या आणि रोजच्या आयुष्यात पावला गणिक , चोरासारखी  नजर घेवून , दबक्या पावलान जीवाच्या आकांतान भटकणार्या !!!! कधी जातात  हुंडा बळी म्हणून आगीच्या भक्ष्य  स्थानी कि कधी जातात  रस्त्याच्या कडेला स्वताच शील हरवून आणि अस्तित्वाला यायच्या आधीच जातात गर्भात मरून  !!!!!! मग का बसवायचा घट  , का करायची घटस्थापना?? 
                       
                  एवढ्या भयानक चीड असलेल्या प्रश्नांना घेवून मी गाभारयत आले आणि  थरकाप्च उडाला …। काळी मतेच मान्न्दीर  !!!!!!!! केवढी मोठ्ठी हि मूर्ती आधी भीतीच वाटली काय दबदबा आहे या आई चा?????  उगाच कां  घालात असतील देव सुधा लोटांगण तिला?????

 "बये दार उघड , बये जागी हो…… माज माजलाय समाजात ……. बये शैतानाची डोकी गळ्यात अडकवून ये… बये हाताथ खड्ग घेवून ये…" 

या कोण बायका … एवढ्या आर्जवान का काळी माते ला साकड घालताहेत ??? चल आपण पण जावू , बोलावू तिला.…… 

"ये ग माझ्या शिलाच्या  रक्षणाला … माझ स्त्रीत्व धोक्यात आलाय , ते जातंय गर्भातच खुडून , जातंय रस्त्याला क्षीण होवून , पावूल टाकेल तिथ दिसतात भयाण स्वापद , भयान  नुसती गाळण उडतेय ग  आई . !!!! दार उघड आणि ये……. जागी हो आणि ये…… हातही खड्ग घेवून ये…… "

" जागी हो ग बये जागी हो …,रनचन्दिके जागी हो……।   , मर्दिनी जागी हो……. , काळी मते जागी हो……. " 

आणि हे काय कसल्या या विजा चमकताहेत , कसलं हे वादळ , या घंटांचा निनाद …???????  आणि काळी काळी रक्ताळलेली हि भली मोठ्ठी कोण …. ????????  

अर्रे , हिला काय घबरयच… हि तर माझही आईइ ………… आली आली आईइ !!! रक्षणाला आली माझ्ही आई  , हाथी  घेवून  त्रिशूल आणि खड्ग … रक्त प्यायला आली नराधमांच …… माझही आई … !!!!! 

भवानीचा उदो उदो ,…… रंचादिकेचा उदो उदो …… मा काली चा  उदो उदो…। 

बये न दार उघडल , बये न दार उघडल ……. 

???? पण प्रश्न काही केल्या सुतेन…. " पण आई , अशी का ग तू आक्राळ विक्राळ ? तुझ्या लेकी आल्या दारी आणि का ग तू तप्त आशी ????"

आईच ती मनातला प्रश्न तिला समजला ………… आणि तो मला जाणवला . । आता माझ्हाय शी बोलेल प्रेमान , बसेल जवळ आणि करेल सांत्वन , एकेल माझ्ही व्यथा  आणि फिरवेल हाथ डोक्यावरून …. मग पडेल माझ्या डोळ्यातून पाणी आणि टेकेन तिच्या खांद्यावर माथा मी !!!!. "

पण छे , छे  काही तरी विचित्र घडतंय  , तिचे डोळे एखाद्या राक्षसाच रक्त प्यावेत इतके लाल लाले लाल !!!! हे  खड्ग काय मलाच मारायला आणल कि काय तिन…? 

ती कडाडली, " आग मूढमती माझ्हाय लेकिंनो , जगाची स्तःपणा करून जन्माला घातला तुम्हाला इथ समतोल साधायला !!! आणि मला च "दार उघड बये ,दार उघड बये" म्हणताय . मी जागीच आहे. मूढमती झ्लीये तुमची !!!!  अस्तित्वच भान हरवाय तुमच्या !!! वैचारिकता लयाला गेलीय आणि माझ्हाय दारात याचना करायला आलात तुम्ही ??? तुम्हाला हेच शिकवून माझ्हाय गर्भातून पाठवलं होतात का? उत्तर द्या????? "

आता काय म्हणव, छे , छे  !!!!! दिल होतास तू आत्म भान , शक्ती तेजाची आणि अंश तुझ्हा  माझ्या  हृदये  !!!!!! 

या उत्तरावर ती दुप्पट कडाडली  " कशी झाली  दैना  हि अशी दुर्गेची, कशी जाते पावलो पावली सती अग्नीच्य भक्षी, कोणी केला अपमान तिच्या स्वाभिमाना चा ???? समाजच मुळात आला तुझ्या गर्भातून मग इतका माज कसा चढला ?????? शिकवण दिलीस कि नाही समतेची, समानतेची , विवेक्शिल्तेची ????"  

घाबरत घाबरत आवाज निघाला " हो  , हो !!! सगळ तर लिहील त्या मनुन , संस्कार आणि संस्कीतीच्या नवान एक अलिखित नियम आम्ही पाळतो, नंतर नम्रतेची शाल ओढून  दुय्यम जागा स्वीकारतो !!! पाणी भरतो रंध ,काढतो  मुल जन्माला घालतो , गुर ढोर सारख रबतो…अगदी खर सांगू का तुला ……। रस्त्यावाच्या वासनेला जातो आम्ही बळी , बाजारात विकलो सुधा जातो आम्ही !!!!!   पण आई काय करू ग. आत्ता नाही सहन होत हा जाच . आता मुळी  स्त्री चा जन्मच नाकोगा बाई …!!! हव तर येते जन्माला तुझ्या खड्ग खालच्या  राक्षाच्या !!!! पण आता स्त्री धर्म वैगेरे नको बाई ……. !!!!!!!" 

……………आकाश कोसालाल कि काय, डोळ्यातून तिच्या आग येतेय कि कय…… मी भस्म होतेय कि काय …… ??????

"अग मूढ माती , पळून काय जातेस अशी??? तू लेक महिषासुर मार्दीनीची !!!! तू लेक काली ची … आणि भ्याड अशी तू मरगळलेली ????? शोध  हहृदयातल्या दुर्गेला,  जागी कर काली  ला !!!! आधी शोभ तुझ्यातल्या "स्व" ला !!!! तूच आहेस शत्रू तुझ्हायचं अस्तित्वाची !!!! विचार प्रश्न तुझ्या मनाला  देतेस काय शिकवण तू तुझ्या पुढच्या पिढीला??? शिकवतेस का आदर स्त्रीचा , तिच्या स्त्रीत्वाचा, तुझ्याच विचारात आहे का समानता??????? आहेस तूच घसरून तळागाळात रुतलेली आणि ठेवलास स्वतला तिथच फसवून . निर्मितीच कार्य दिल मी तुझ्या हातही आणि कसल्या समाजाची केलीस हि निर्मिती???? तूच जालातेस लीभापाई एका स्त्रीला , आदर नाही स्त्रीत्वाचा तुझ्याच मनी आणि आलीस माझ्या दारी?????????" 

                           आणि तत्क्षणी तीखादाग माझ्या छातीला छेडून गेल …। माझ्यात  तिच  अस्तित्व जाणवलं …। ती वसते माझ्या मनी, माझ्या ह्रिदयी , म्हणून तर ती म्हणते मला ……. 

शोध आधी माझ्या अस्तित्वाला 

जे आहे तुझ्या ह्रीदाई !!!! 

मी नाही यायची रोजच्या घडी 

लढाई हि तुझ्ही 

तूच लढ बाई 

जनमताच दिला माझा अंश तुझ्या थाई 

कसली ग भीती हि तुझ्या मनी??????

                         खट  कन जाग आली किती ब्वाजले ??? कुठली वेळ माहित नाही …… माझ्यासाठी "ब्रम्ह-मुहूर्त " !!!! या वेळे ची नवरात्र "अंतरंगातल्या "दुर्गेच आवाहन" !!!! तिलाच घालाच साकड !!!! तिलाच ठेवायची जागी सदासर्वकाळ !!! 

                             




Monday, 2 September 2013

"ती…………०१ "

                   

                           किती वेळा हातात  घेतलं आणि ठेवलं हे पुस्तक ???? पुन्हा "नंदा  प्रधान " वर येवून थांबायचे . दीड वर्ष्यापुर्वी सुद्धा  इथच येवून थांबले होते. मला सगळ दर्शन व्हायचं  "ती" च  इथ !! अर्थात साधर्म्य तसा काहीच नसायचा. पण अजीबच "नात"  होत "ती"च आणि माझ्ह!!!!
                         
                           पुण्यात नवं  होस्टेल शोधायची धावपळ सुरु होति. तश्यातच एक सापडलं .तीन चार खोल्या , त्यात राहणाऱ्या १० मुली थोड congested होत पण माझ्हाय्साठी मिळाली ती जागा मस्तच  होती. जागा  आवडली एक्दम. होस्टेल तसे चांगले होते मला हवी तशी एक खोली , दोघींना पुरावी एवढी, मोठ्ठी खिडकी,  मागे मस्त झ्हाडी. गाड्यांचा आवाज नाही कि गोंगाट नाही. कुठल्या तरी शेतावरच्या घरात याव अशी  आणि याच इमारतीच्या समोरचा भाग इतर इमारतींनी वेढलेला म्हणूनच  कि काय माझ्याच खोलीत माझ मन रमायचं.  एकदम आवडली जागा आणि लागोलाग  समान हलवलं सुद्धा तिथे. बाकी मग सुरु झ्हाल daily work. एक प्रश्न होता अभ्यास करणारी रूम पार्टनर हवी होती. एक आठ दिवसांनी  असेल, बारीक शिडशिडीत,थोडी सावळी मुलगी माझ्या कडे आली. बर्याचदा आमने सामने भेट व्हायची  पण बोलाव असे काही घडल न्हवत. काही दिवसांनी ती माझ्ही  नवी रूम पार्टनर म्हणून आली. जे आली ती आयुष्यभराच नात बनवण्यासाठी!! पहिले काही दिवस आमच तसे  शुल्लक म्हणव असे सुद्धा बोलण  होत न्हवत .

                              मला वाटत नात असे भसकन होत नसत किंव्हा ते ठरवून जोडता येत नसत आणि ठरवून तोडता  येत नसत. जोडायचं म्हणून जोडलेलं ते नातच ते काय ??? बहुदा हा केवळ योगायोग असतो किंव्हा कदाचित विधिलिखित असाव आपणाला कोणती  माणस केंव्हा भेटावीत आणि या प्रवासात ती कुठ  पर्यंत यावीत हे. तसंच  बहुदा असाव माझ्या आणि "ति" च्या बाबतीत !!  एके दिवशी नेहमी प्रमाणे सकाळच्या ५. च्या गाजराला दोघी  हि जाग्या झ्हालो . फ्रेश होवून चहाचे पेले हातात घेवून आम्ही आलो. माझ्हाय टेबल वर ठेवलेल्या तिच्या चहाच्या पेल्यात मला काळा  चहा दिसला आणि पुढ कित्तेक वेळा कित्तेक दिवस तो दिसत राहिला.दोघी एकमेकिंच्या खाजगी गोष्टीवर बोलाव एवढे जवळ आलो न्हवतो. पण अशीच एक संधी  साधून तिच्या उकळणाऱ्या चहाच्या पातेल्यात मी दुध ओतल. हे चहाच दुध आमच्यातल्या दुरावा मिटवण्यासाठी कारणीभूत ठरलं असाव असा मला कायम वाटत. या नंतर काळा चहा कसा औषधी असतो हे सुधा तिच्या.मला  होत कि एके संध्याकाळी कंटाळा आल म्हणून अशीच पडून राहिले होते आणि ती आलि. खुश होती हातात दुधाची पिशवि. "ती" च हास्य भलताच लोभस !!!

" काय madam आज अभ्यासल बुट्टी वाटत ?" आज पहिल्यांदा ती मला स्वतहून खुशीत काही तरी बोलली होति.  मी चमकलेच.

"कंटाळा लेली आहेस का ? आले मी चहा घेवून दोघींना  हि." असे म्हणत  ती गेली सुद्धा!!

 कोणता वार   होता,कोणती तारीख होती , कोणती वेळ होती माहित नाही ती  पण त्या वेळेन मला एक निस्वार्थी, निशपाप जिवाभावाची मैत्रीण दिलि.

"चहा पावडर आणि साखर घे माझ्याकडे आहे बघ "…… मी.

मला तिची उद्याची चणचण जाणवली ….पन काही उत्तर नाही आल. direct मसाला चहाच हातात आला माझ्या. अगं , पैसे संपले होते माझे. दूध कुठून आणणार? चहाच्या कपात पाहत ती बोललि.

 "आग मग घ्याचा न माझ्या कडून " …

 " नाही ग कश्या ला????  आपली परिस्थिती आपल्या बरोबर. आणि तशी तू नवीनच न ग. उगाच कश्याला तुला त्रास्स.??

" मग मी रोज चहा घेईन हा सांगते?"

" हो!! रोज घे. पण दुध असेन तेंव्हाच देवू शकेन मी" हे वाक्य मात्र  खोट  हसन मिसळून दिल होत मला तिन.   त्या दिवशी एक रिकामा कप हातातून बाजूला ठेवला आणि  मला जाणवलं एक पुस्तकच हातात पडल होत माझ्हाय. बराच गप्पा झ्हाल्या. हळू हळू सगळा उलगडा व्हायला लागला. तिला माझ्यात आणि मला तिच्यात "मैत्र" या शब्दाबद्दल विश्वास  जाणवायला लागला आणि मला एक हक्काची मैत्रीण मिळाली . पुढ  एकमेकीला बिनधास्त  जागा मिळाली मनातले विचार share करायला ….त्या हि पुढे share कारण मग पडल मग मात्र मैत्रीचे घट्ट  धागे जुळायला लगले. पुढे आम्ही २.५ वर्षे एकत्र होतो कधी वाद झ्हाल्याच आठवत नाही. "ती" म्हंजे एक भन्नाटच होति. माझ्हाय मेंदूच्या कुवती बहेरचि. इतिहास पदवीधर असणर्या  या बहाधार्नीची MCM  नावाची Computer Science मधली  Masters degree चालू होति.

                            एक पुस्तक उलगडाव तशी तिच  गतं  आयुष्य उलगडत गेल माझ्या समोर . प्रेमात धिक्कारली  गेलेली, खंगलेल्या आईबाबा ला बघून खूप अस्वथ होणारी "ती". पुण्यासारख्या व्यवहारी शहरामध्ये आलेली हि भावूक मुलगी हळू हळू कठोर, भावना शुन्य आणि व्यवहारी होताना मी पहिली.  वेळ खूप शिकवत जाते असे आपण म्हणतो पण खरच किती लोक शिकतात या वेळेपासून ???? म्हणून  'आपप्न खूप शिकत जातो' हे अधिक महत्वाच . "ती"  ला जे जे वेळेन शिकवलं ते ते तीन डोळ्यातून टिपूस हि न काढता पचवल. कित्तेक दा डब्याला  पैसे नाहीत असे म्हंटल्यावर Maggie , बटाटे, पोहे अश्यावर   दिवस ढकलले. एवढ्या चांगल्या होस्टेल मध्ये राहण्याचं कारण एकाच कि इकडून तिकडून उधारी करून घरातल्यांनी मिळवून दिलेल्या Computer ची इथे राखण होणार होति. नाही तर कुठ ठेवलं असत तिन  हे समान??????

                             तिच्या  पद्व्युतार काळात आम्ही भेटलो, आणि मी एका संघर्ष्याची साक्षीदार झ्हाले . सकाळी लवकर उठाव दुध, चहा करून college गाठावं. अर्ध्यातासाच्या सुट्टीत फक्त २ चपात्या आणि भाजी चा डब्बा रूम वर येतो म्हणून चालत याव ,  पुन्हा संध्याकाळी ४ ला याव आणि पुन्हा ८. पर्यंत job करावा आणि  पुन्हा येवून अभ्यस हा तिचा दिनक्रमच होत. छोट्या pouch मध्ये पैसे नसतिल तर काळा  चहा घेणारी ती आज ३५०० रुपयाच घड्य्याल मनगटावर घालून फिरते या वर विश्वास   नाही बसत. आई बाबा , विधवा बहिण यांच्या बद्दल हळवी असणरी "ती", शहरी वातावरणात मिसळू पाहणारी पण "गावाकडची" म्हणून हिणवली गेलेली "ती" मी पहिली आणि फक्त बघ्याच्या भूमिकेत असताना मला भन्नाट बदल दिसले तिच्यात. सध्या कपड्यात वावरत असताना आजूबाजूच्या वातावरणान तिला शिकवलं इथ जर पाय रोवून राहायचं असेल तर इथलाच व्हाव लागेल आधी. हळू हळू तीन स्वत समजून उमजून असे बदल राहणीमान , बोलण या सगळ्यावरच ती खूप विचार करायची आणि मी थक्क व्हयचे. हळू हळू आमच्यात मैत्री घट्ट  व्हायला लागली.  दोघी हि एक-मेकीच्या सुख दुखाचे साक्षीदार होतो. पुढ पुढ तर एकमेकींना काही न सांगत राहील असाव असा शक्यच न्व्हत. माझ्हाय आयुष्यात माझ्या आई पप्पान ननतर च एकमेव जवळच नात होत हे आणि आज हि आहे हे!! कोणी  विचाराल मला कि "आळीच  फुल्पखारातल रुपांतर पाहिलं आहेस का?" तर मी म्हणेन खरच हो. ते इथच पाहिलं होत. हळू हळू धाडशी होत जाणारी, आजूबाजूला चमचम जग असताना पै आणि पै चा हिशोब ठेवून धाडसान पावलं टाकणारी मुलगी मी पहिलिय. तिच MCM करण त्यानंतर पुढ जाण्यासाठी  वेगवेगळ्या courses ची माहिती घेण. त्यासाठी पैशाची जुळवाजुळव हे सगळ मी बघतच होते.  हे घडत असताना मला एक जाणवलं कि कोणत्यातरी ठाम विश्वासावर पावलं टाकायची. तिच्याशी बोलताना मात्र तिचे सगळे प्रश्न जाणवायचे हळवेपणा,अपमानाने दुखावलेली, कोणीतरी ढकलून देत हि भावना सारखी  तिच्या मनात डोकावायची. पैश्याच्या चनचनिवर  मात करायला ती data entry सारखी काम करत होती हे जेंव्हा मला समजले तेंव्हा तर मी थक्कच झ्हाले होते . माझ्हाय चांगल्या - वाईट वेळेमध्ये मध्ये ती  साक्षीदार होति. ती माझ्ही  भरभक्कम विश्वासाची जागा होती आणि आज हि अहे.कित्तेक वेळा ओंकारेश्वराच्या  कट्ट्यावर आम्ही मूक पणे बसलो असायचो आणि त्या मौनाच्या वेळेत सुधा संवाद चाललेला असायचा.  कित्तेक वेळा रूम मध्ये चार चार दिवस बोलणच व्हायचं नाही आम्ही दोघी हि दोघींच्या आपल्या प्रश्नांच्या tension मध्ये असायचो पण  समजून  जायचं सार काही . वेगळीच वेळ होती ती !!!! मी एकीकडून कोलमडत असताना, "ती" मात्र भक्कम आधार देवून असयचि मला. स्वताला सावरत सावरत मला हि सावरायची!!!!  पण वेळ स्थिर नसते. कालांतराने नोकरी निम्मित आम्ही दोघी हि दुरवलो. मध्ये मध्ये phone वर संपर्क असायचा . जवळपास एक वर्ष्या नंतर जेंव्हा तिला  भेटले तेंव्हा एका "software company " मध्ये काम करणारी "ती" मला भेटली. माणूस स्वताला बदलवू शकतो म्हणजे किती ???? याला जश्या काही सीमा नाहीत तशी "ती" माझ्यासमोर !!!!!सीमांच्या हि पुढा जाऊ पाहणारी  !!!!!

                              मला आठवत असे ,  पानझडी  च्या  ऋतूमध्ये आमच्या खिडकी मागच्या वेली गळून पडल्या . रूम मध्ये खूप उन यायला लागल , पडदा ओढला गेला. किती दिवस तो असाच  सकाळी सकाळी ओढला जायचं आणि संध्याकाळी खुला व्हयच. आणि एके दिवशी मात्र आम्ही पडदा ओढलाच नाही वेलीं वर बारीक बारीक बोटभर लांबडी कोवळी पान आली होति. सगळा प्रकाश त्या कोवळ्या पानावरून रूम मध्ये येत होत. पोपटी रंगाचा खूप चं प्रकाश रूमभर पसरला होत. जुन्या पानांना साठलेल्या माती सहित निसर्गान वाहून नेल होत. आत्ता मस्त कोवळा प्रकाश आणि नवी पालवी आली होति. तशीच नवी पालवी ती न सुधा ओल्धून घेतली होति. हव असलेल आर्थिक स्वावलंबन तिन मिळवलेल होत. स्त्री किंव्हा बाई  किंव्हा मुलगी म्हटलं कि "लग्न" हेच शेवट समजल जात पण या हि पलीकडे स्वतच नाव आणि अस्तित्व याची जाणीव तिला झ्हाली होति.
               
                                   आज पुन्हा "नंदा प्रधान" वाचताना मला "ती"न दिलेल्या पहिल्या payment नंतर ची party आठवली. मन एकदम "ती"च्या  आठवनीन मध्ये गेल, खर तर technology च्या युगात संपर्क साधन कठीण नाही, पण शांत पणे बसून बोलण  आणि  थोडा वेळ न बोलत मुक्यान घालवण आणि आपल्या या "मैत्र" ला समजून घेण जमेल का पुन्हा??????  मी वाट  पाहतेय तिच्या दुसर्या party ची !!!!!!!!


                     
                               

Thursday, 25 April 2013

अनुभव एक स्त्री आहे म्हणून !!!!! (०१ )

                           काही विशेष नाही हे रोजच होणार,  त्याला समोर जाण्यासठी सज्ज असाव एवढाच !!!!! कारण आत्ता हेच बघा न…
                       कालच नाही का मी कराड ला जाण्यासाठी बस ची वाट  पाहत थांबले होते. तोबा गर्दी !! धक्का बुक्क्कीतुन  आत जात एका सीट  वर मला २० - २१ तल्या मुलीन जागा दिली. मी बसतानाच पाहिलं होत कि , तीने  त्या सीट वर आधीच कोणी तरी खिडकीतून ठेवलेली एक पिशवी वरच्या सामानाच्या र्य्यक मध्ये ठेवली होति. तोब्बा गर्दी होति…। माझ्या बाजूला ती खिडकी ला बसली होती तेवढ्यात एक सद्गृहस्थ कदाचित ४० तले असावेत ते…. !!! ते आले, " मला वाटत तुम्ही माझ्या सीट  वर बसला आहत तेंव्हा उठा !" असे ते म्हणाले. तरी हि ती आणि मी काहीच नाही बोललो ननतर त्यांनी आम्हा दोघींना " अहो आज्जी आणि काकू बी उठता का ? असे विचरले. मी इथे पिशवी ठेवली होती पहिली नाही का? चांगली शहाणी सवरती दिसतिएस ग. काळात नाही का तुला ?" असे तो अर्वाच्य भाषेत बोलू लागला. आत्ता मात्र ती मुलगी शांत बसलीच नाही ती स्पष आणि शांत शब्दात म्हणाल्की "काका , तुम्ही गर्दीचा त्रास नको म्हणून पिशवी खिडकीतून ठेवलीत आणि आम्ही गर्दीचा त्रास घेऊन इथे धक्के खात आलोय. मग का उठाव? " यावर काहीही न एकता तो मनुष्य दिरेच्त तिच्या अंगावर धावून आल …।"अ तुझही अक्कल तुझ्या जवळ ठेव आणि तिथून बाजूला हो!!! " हे शब्द कुठल्या माळरानावर किंव्हा उजाड …… आडोश्याला  कोपर्यात किंव्हा बंद खोलीत न्हवते. तिथे तोबा गर्दी होती, खूप पुरुष आणि स्त्रिया होत्या , सरकारी कार्म्चार्यान्पेकी एक conductor  आणि driver  पण होता . असे असताना कोणीच काही बोलले नाही त्या पुरुषाला!!!  अर्थात ती मुलगी म्हणून  कोणी तिची बाजू घ्यावी असा मुर्खासारखा माझा विचार तर आजिबातच न्हवता पण तीच बोलन मला पटल  होत …।तिंच  काय पण मी सुद्धा  त्या गर्दीतून  धक्के खातच आले होते आणि एन तरुणीतल्या  त्या मुलीला आणि मला जर तो पुरुष उपहासाने "आक्का , आजी , काकू " अश्या उपाध्य लावून टिंगल करत असेल आणि इतर कोणी जर काहीच बोलत नसेल  तर काय कराव? आत्ता मात्र मला आणि तिला  गाप्प बसवत न्हव्ते…। "ओ conductor , गाडी कराड डेपो मध्ये घ्या आम्ही विचारतो कि depomaster  ला, तुम्ही काय इथे घरचे जावाई करून ठेवलेत का रोज प्रवास करणार्यांना? " माझ्या तोंडातून एकदम आवाज!!! डोक जाम गरम झ्हाल होत.  आज कराडच काम नाही झ्हाल तरी चालेल पण इथ "कोणी हि या आणि टिकली मारा " हि एका स्त्री बद्दल mentality मी स्वतावर आजिबाअत खपवून घेणार न्हवते !!!! तो पुरुष आहे किंव्हा मी स्त्री हे मला माहित नाही पण एवढ माहित जरूर होत कि मी एक माणूस आहे , एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला selfrespect अजून शिल्लक आहे.
                    तो हि एकदम व्हास कान ओरडला " ओ घ्या गाडी डेपो मध्ये. बघू काय होतंय ते. इथ उठ म्हणून सांगितलं तर उलट बोलायला लागल्यात" अर्थात माझ्या डोक्याच्या शिरा आता मात्रमात्र तट तटायला  लागल्या होत्या. मला हे समजत नाहव्ते कि कोणती एखादी मुलगी किंव्हा बाई उलट बोलली म्हणजे काय याच अघोर ओमान झला कि काय आणि कित्ती वेळचा हा मनुष्य आम्हा दोघींची भर बस मध्ये टिंगल करतोय त्याच काय? काय हि घातीय mentality !!!! चांगला शहाणा शिकलेला दिसत होते…हाह्तातल्या  घड्याळावरून , कपड्यावरून पायातल्या बुटावरून  !!!! आता समजून चुकले होतेच शिक्षण म्हणजे माणूस शहाणा असा होत न्हाई . अर्थात मी "माणूस" हा सह्ब्द स्त्री आणि पुरुष या दोन्ही साठी वापरला आहे. "आम्ही सुद्धा इथे पैसे देऊनच चढलो आहे ." ती एकदम बोलली. तिच्या आवाजात आता धार आली होती. मी तला साथ देणारी स्त्री म्हणून नव्हे तर ती जे बोलली त्या खर्याला साथ देनार तिला कोणीतरी भेटले होत…… !!!! पुढच्या मिनिटाला conductor ने येउव्न त्या माणसाला चांगलाच समज दिला . तरी हो त्याच्या गावाचा stop आल्या नंतर उतरताना आम्हा दोघीकडे पाहून आम्हाला उद्देशून म्हणाला" तुमच्या पिशव्या कधी पुध्ये मागे सापदुदेत , मी direct खिडकीतून बाहेर फेकणार!!!! " आम्ही हसत होतो…… झल्या प्रकारावर नाही तर त्याच्या mentality वर……!!!!  हा आमच्या पुरुष प्रधान समाजाचा एक प्रतिनिधी !!!!
                 अर्थात ,……………… अनुभव चांगलेही आहेत आणि वाईट देखील आणि त्यातलाच एक हा................ जो खूप मनाला दुखावणारा  होता आणि विचार करायला लाव्नारा सुद्धा !!!!  ......................!!!!