......किती वेळच हे थांबण आणि कुठून या गुंता गुन्त झलेल्या विचारातून सरळ असे काही हाताला लागत नाही .......लोकाल च्या डब्ब्यात चढताना सुरु असलेला गोंगाट , कलकलत यातच पुन्हा पुन्हा मला "तिच" अस्तित्व जाणवत राहत. किती फरक असतो ना ...? चेहरे पट्टी वेगळी वेगळी, केसांची पद्धत , त्यांना मांडण्याच्या पद्धती....कपाळावरच्या टिकली... त्यांचे आकार, रंग...कधी बोलके - पाणीदार , कधी निस्तेज, कधी नुसतेच निरीक्षण करणारे डोळे ...वेगवेगळ्या रंगाची कपडे, डोक्यावरचे रुमाल, हातातल्या bages, पर्सेस , तंगुसच्या पिशव्या , कित्तेक वेळा नुसतेच रुमाल......कित्तेक चेहरे झ्हाक्लेले, कित्तेक खळाळत हास्य दाखवणारे... कित्तेक थोडे भांडणारे, कित्तेक निशब्द .... .... सगळ कसा रंगीबेरंगी , वेगवेगळ आणि वेगवेगळ .....तरी पण एकच गोष्ट समान , सारखी.... परमेश्वरन दिलेलं "बाई" पण !!!!!
अनोळखी तरी पण रोजच्या प्रवासात, खरेदीत या बाया अश्या भेटतात आणि आपसूक ओळखीच्या बनतात......... खंर तर ती ओळख असते.... एक "बाई" आहे
यातून...!!!
"बाई"आहे म्हणून कि एक "बाईमाणूस" म्हणून????? तसा ह्या शब्दाचा परिचय बर्याच वर्ष्यापुर्वी झ्हाला. एका उच्च पदस्थ मित्राबरोबर सरकारी कार्यालयातील कामा संधर्भात बोलताना .....त्याच वाक्य " हे काम बाईमाणसाला बर नाही वाटत घरातील कोणता तरी माणूस.... म्हणजे किनिई ...पुरुषान बोललं तर बर!!!" मग थोडा मनात क्त्तेकदा उसाळी मारत राहिला हा शाब्द ....
" बाईमाणूस " आणि माणूस म्हणजे नेमक कोण? का ? बाई,माणूस नाही ? हळू हळू
आठवण झ्हाली माझ्याच गत्क्षानांची ........ उघड्या
माळरानावरून दोन हात पसरून वाहणाऱ्या हवेला कापत धावण...... हवी तेंव्हा सायकल घ्या आणि फिरा अख्या कॉलोनी भर.... हवे तसे हुंदादा।... आता नाही करत यायचं हं तसे काही "बाईमाणसाची" जात?????????.
मध्येच वाचनात आली ती मल्लिका साराभाई ....आणि तिचा राग ...... का? कश्या बद्दल? तिला या संस्कृतीचा का एवढा तिटकारा...? तीन का प्रश्न विचारला " माणूस " म्हणजे "पुरुष" मग "बाई " म्हणजे कोण? माणूस नाही का ? ..काय कळत होत तेव्हा ? काहीच नाही ....नुसतेच शब्द वाचले।.. हि बी काही बाही बोलतेय ...वेड्यासारखी. .... आता हळूहळू कळतंय।.... खर तर ....हा विचार डोकावायला तसा काही निमित्त न्हवातच. स्वासागणिक हे रोजच अनुभवला येणारं, उगःड्या डोळ्यांनी इतरांवर दिसणार..... आणि अगदीच खर म्हणजे आज काही कोणत्या म्ह्पुरुशाची (स्त्रियांचा उधार केलेल्या) जयंती किंव्हा पुण्यतिथी हि न्हवती.... पण हे लागल मनाला सकाळीसकाळी ......शिडशिडीत बांध्याच्या बाईन न पेलवणार (माझ्हाय्भाषेत एक मोठ्ठी गादी उचलावी )एवढ समान उचलाल होत , काही बाही कारण झ्हाल आणि ...... बरोबरच्या रिकाम्या पुरुषान खण कन मुस्कटात हाणली..... कोलमडलीच ती..... एवढ ओझ उचलणाऱ्या तिन इतका पुरुषार्थ रोज दाखवावा आणि उलट मुसाकतात न मारत .... का गप्प बसावं ? हा प्रश्न मला कितीवेलचा छलत राहिला ..........आत्ताच नाही ....तर केंव्हाच आहे......
"in the name of honour "च्या mukhatar mai , Not without my doughter ची Betti mehmudi ..... "Eat , Pray and Love म्हणणारी एलिझाबेथ , कविता महाजन च्या "ब्र" ची प्रफुल्ला ...ते मामुत्ती (इंदिरा गोस्वामी) च्या पासून हीच ती मल्लीक्का साराभाई ....या सगळ्या बायाच ना ..... ? मग यांनाच साक्षात्कार होतां का कि आपण हि माणूस आहोत याचा ....इतरांना का नाही होत.....? अगदी परवा नाही का मैत्रीण म्हणली कि ...समोरच्या टपरीवर नको जायला चहा साठी ....मानस आहेत तिथे...... मग आपण कोण?
मग आपण कोण.....? कित्ती वेळ हा प्रश्न नुसताच रेंगाळत होता मनात .. असाच ...... बाहेर धावणारी झ्हाड बघत ......पुन्हा पुन्हा तिथेच होता तो..... अगदी आभासी ....आपला समाज सुधारो आहे.... तसाच .....? नाही का ,....झ्हाड धावताहेत हा आपला एक आभासाच ...तसाच ....फक्त बाई धावतेय..... रेल्वे सारखी आणि समाज तिथेच आहे झाडांसारखा? अजून हि " बाईमाणूस " राहिली ....मग " बाई" माणूस कधी होणार?