Total Pageviews

Friday, 2 November 2012

मिट्टी जैसे सपने ,,,,,,,,,,,

फिर से उड़ चला
उड़ के छोड़ा है जहां नीचे.......

मैं तुम्हारे अब हूँ हवाले......

दूर-दूर लोग-बाग़ ....
मीलों दूर ये वादियाँ.......

कर धुंआ धुंआ तन ..........
हर बदली चली आती है छूने..
और कोई बदली.....
 कभी कहीं कर दे तन गीला ये है भी ना हो....

किसी मंज़र पर मैं रुका नहीं
कभी खुद से भी मैं मिला नहीं
ये गिला तो है मैं खफ़ा नहीं..........

शहर एक से, गाँव एक से
लोग एक से, नाम एक...............

फिर से उड़ चला...............

मिट्टी जैसे सपने ये कित्ता भी
पलकों से झाड़ो फिर आ जाते हैं
इत्ते सारे सपने क्या कहूँ......

किस तरह से मैंने तोड़े हैं छोड़े हैं क्यूँ .....

फिर साथ चले, मुझे ले के उड़े, ये क्यूँ.......

कभी डाल-डाल, कभी पात-पात
मेरे साथ-साथ, फिरे दर-दर ये..........

कभी सहरा, कभी सावन....
बनूँ रावण क्यूँ मर-मर के....

कभी डाल-डाल, कभी पात-पात
कभी दिन है रात, कभी दिन-दिन है......

क्या सच है, क्या माया है दाता.........

इधर-उधर तितर-बितर
क्या है पता हवा लिए जाए तेरी ओर.......

खींचे तेरी यादें तेरी ओर.....

रंग बिरंगे,,,,,,,, वहमों में मैं उदास क्यूँ......................................................




इन लफ्जोकी मैं शुक्रगुजार ....................................

Monday, 23 July 2012

पत्ते मेरे घर आये ..........पत्ते मेरे घर आये......!!!

             
पावसाची एक सर ..!!!!!!!!पावसाची एकच सर,  का??? केवढा बदल झ्हाला   ... जीवन अंकुरल  या पावसाच्या एका सरीन ... नुसतीच खिडकीच  दार उघडाव   आणि पहाव ,.....रूमभर नुसताच ..पोपटी प्रकाश.... सुखद, सुंदर ... हवाहाव्सा ........!!!!!!!!! जिवंत पणा  हाच सुंदर असतो  का? कित्ती दिवसाच्या काळ्या झलेल्या या फांदीला .... मूकपणे  मृतं  घोषित केलं होत या मानवी मनांन .......एका पावसाच्या सरीन काय हा चमत्कार केला ..........इवली इवली किती सुंदर पान  चं पण आपोआपच आली होती...... किती तरी द्दीवासापुर्वी प्रश्न पडला... किती धूळ बसते या झ्हादन वर मग .मग कोण साफ करते ..माणूस atleast स्वताचा स्वत ला स्वच   ठेवतो ...मग या झ्हादांच  काय? आणि काय  आह्चार्या ..... येणाऱ्या वेळेने  मुकपने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली.
                                 काळ्या कुळकुळीत झलेल्या त्या खोडावर किती मातीचे, धुळीचे राप बसले  होते.......पानही  पार अगदी हिरव्या ऐवजी .मातकट दिसत होती....आणि आजचा झ्हालेला  बदल बघून मला डॉ. उमा त्रिलोक ची कविता आठवत होती............
                                                                
                                                                   पत्ते मेरे घर आये
पत्ते मेरे घर आये......
चांदनी मैं घुले...
गीत बनते,ज्हंज्हनाते....गुनगुनाते---
पत्ते मेरे घर आये ......
पत्ते युही बने रहे पेड़ पर
फिर भी ज्हकते, लांघते,
खिड़की की देहरी पर कर
सामने कि दिवार पर
धिमेसे, सह्मेसे, डोलते
पत्ते मेरे घर आये...........
                                                .
                                                

                      सुंदर कोवळ पिवळसर प्रकाश सार्या खोलीभर झला होताकाळ काळ परवापर्यंत निर्जीव वाटणार्या त्याच खोडातून आज पुन्हा जीवन अंकुरात होत............!!!!!! खरच जीवन अन्कुरायला लागलाय .......!!!!!!

                                                             


Tuesday, 10 July 2012

"बाईमाणुस" .......... कि बाई एक माणूस.............!!!




                          ......किती वेळच हे थांबण आणि कुठून या गुंता गुन्त झलेल्या विचारातून सरळ असे काही हाताला लागत नाही .......लोकाल च्या डब्ब्यात चढताना सुरु असलेला गोंगाट , कलकलत यातच पुन्हा पुन्हा मला   "तिच" अस्तित्व जाणवत राहत. किती फरक असतो ना ...? चेहरे पट्टी वेगळी वेगळी, केसांची पद्धत , त्यांना मांडण्याच्या पद्धती....कपाळावरच्या टिकली... त्यांचे आकार, रंग...कधी बोलके - पाणीदार , कधी निस्तेज, कधी नुसतेच निरीक्षण करणारे डोळे ...वेगवेगळ्या रंगाची कपडे, डोक्यावरचे रुमाल, हातातल्या bages, पर्सेस , तंगुसच्या पिशव्या , कित्तेक वेळा नुसतेच रुमाल......कित्तेक चेहरे झ्हाक्लेले, कित्तेक खळाळत हास्य दाखवणारे... कित्तेक थोडे भांडणारे, कित्तेक निशब्द .... .... सगळ कसा रंगीबेरंगी , वेगवेगळ आणि वेगवेगळ .....तरी पण एकच गोष्ट समान , सारखी.... परमेश्वरन दिलेलं "बाई" पण !!!!!
        अनोळखी तरी पण रोजच्या प्रवासात, खरेदीत या बाया अश्या भेटतात आणि आपसूक ओळखीच्या बनतात......... खंर तर ती ओळख असते.... एक "बाई" आहे
यातून...!!!       
       "बाई"आहे म्हणून कि एक "बाईमाणूस" म्हणून????? तसा ह्या शब्दाचा परिचय बर्याच वर्ष्यापुर्वी झ्हाला. एका उच्च पदस्थ मित्राबरोबर सरकारी कार्यालयातील कामा संधर्भात बोलताना .....त्याच वाक्य " हे काम बाईमाणसाला बर नाही वाटत घरातील  कोणता तरी माणूस.... म्हणजे किनिई ...पुरुषान बोललं तर बर!!!" मग थोडा मनात क्त्तेकदा उसाळी मारत राहिला हा शाब्द ....
" बाईमाणूस " आणि माणूस म्हणजे नेमक कोण? का ? बाई,माणूस नाही ? हळू हळू आठवण झ्हाली  माझ्याच गत्क्षानांची ........ उघड्या  माळरानावरून दोन हात   पसरून वाहणाऱ्या हवेला कापत  धावण...... हवी तेंव्हा सायकल घ्या आणि फिरा अख्या कॉलोनी भर.... हवे तसे हुंदादा।... आता नाही करत यायचं हं तसे काही "बाईमाणसाची" जात?????????.
                          मध्येच  वाचनात आली ती मल्लिका साराभाई ....आणि तिचा राग ...... का? कश्या बद्दल?  तिला या संस्कृतीचा का एवढा तिटकारा...? तीन का प्रश्न विचारला " माणूस " म्हणजे "पुरुष" मग "बाई " म्हणजे कोण? माणूस नाही का ? ..काय कळत होत तेव्हा ? काहीच नाही ....नुसतेच शब्द वाचले।.. हि बी काही बाही बोलतेय ...वेड्यासारखी. .... आता हळूहळू कळतंय।.... खर तर ....हा विचार डोकावायला तसा काही निमित्त  न्हवातच. स्वासागणिक हे रोजच अनुभवला येणारं, उगःड्या डोळ्यांनी इतरांवर  दिसणार..... आणि अगदीच खर म्हणजे आज काही कोणत्या  म्ह्पुरुशाची  (स्त्रियांचा उधार  केलेल्या)  जयंती किंव्हा पुण्यतिथी हि न्हवती.... पण हे लागल मनाला सकाळीसकाळी ......शिडशिडीत बांध्याच्या बाईन न  पेलवणार (माझ्हाय्भाषेत एक मोठ्ठी  गादी उचलावी )एवढ समान उचलाल  होत , काही बाही  कारण झ्हाल आणि ...... बरोबरच्या रिकाम्या  पुरुषान खण कन  मुस्कटात हाणली.....  कोलमडलीच ती..... एवढ ओझ उचलणाऱ्या तिन इतका पुरुषार्थ रोज दाखवावा आणि उलट मुसाकतात न मारत .... का गप्प बसावं ? हा प्रश्न मला कितीवेलचा छलत राहिला ..........आत्ताच नाही ....तर केंव्हाच आहे...... 
                               "in  the  name  of  honour  "च्या  mukhatar mai ,   Not  without  my  doughter   ची Betti  mehmudi .....  "Eat , Pray  and  Love  म्हणणारी एलिझाबेथ , कविता महाजन च्या "ब्र" ची प्रफुल्ला ...ते  मामुत्ती (इंदिरा गोस्वामी) च्या  पासून हीच ती मल्लीक्का साराभाई  ....या सगळ्या बायाच ना .....  ? मग यांनाच साक्षात्कार होतां का कि आपण हि माणूस आहोत याचा ....इतरांना का नाही होत.....? अगदी परवा नाही का मैत्रीण म्हणली कि   ...समोरच्या टपरीवर नको जायला चहा साठी ....मानस आहेत तिथे...... मग आपण कोण?   
                        मग आपण कोण.....? कित्ती वेळ हा प्रश्न नुसताच रेंगाळत होता मनात .. असाच ...... बाहेर धावणारी झ्हाड बघत ......पुन्हा पुन्हा तिथेच होता तो..... अगदी आभासी ....आपला समाज सुधारो आहे.... तसाच .....? नाही का ,....झ्हाड धावताहेत हा आपला  एक आभासाच ...तसाच ....फक्त बाई धावतेय..... रेल्वे सारखी आणि समाज तिथेच आहे झाडांसारखा? अजून हि " बाईमाणूस " राहिली ....मग " बाई" माणूस  कधी होणार?
 

Monday, 18 June 2012

आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....!!!

                    

                 वय वाढायला लागला कि शाहनपण येत म्हणतात..... त्याचीच परिणीती कि काय आजकाल पप्पा बरोबर वाद होतात .......बर्याच विषयावर.....आणि पप्पा तरी हि समजावत असतात  मला त्यांच्या  ५ वर्ष्याच्या मुलीला समजावत होते तसे..... माझा एक मित्र त्याच्या बाबाला एकरी हाक मारतो आणि तिथ  त्याच्या आणि त्याच्या बाबाच्या नात्यातला गहरेपणा समजतो....मग जाणवत आपण पण मारुया का हाक अशीच एकेरी....पण नको माझ्हाय्त आपोआपच येत शहाणपण नको ...माझ्हे पप्पा म्हणन्याच...... माझ प्रेम आहे खर !!!
                                    खरच किती समजून घेतो आपण आपल्या पप्पाला ,बाबाला , तात्याला,आन्नाला ....... आणि असंख्य नाव जी आपण देतो ती ..त्याच त्या आपल्या पित्याला ??????? छे छे ...मी तर इथे अगदीच शून्य आहे ! हे समजून घेण्याच शहाणपण पण अगदी या वाढत्या वायापेक्ष्या ....सरणार्या वेळेकडून किंव्हा शिकवणाऱ्या अनुभावाकडून असेल.... अश्याच कित्ती तरी जणान  साठी असेल हा " fathers day " ज्यांना पप्पाच समजून नाही घेता आला , किंबहुना नाही येत ! ओशाळून जायला होत मग,  आपल तोंड लपवायला अगदी ओंजळ सुधा कमी पडते .... शरम वाटते आप्लीआप्ल्यालाच , गुन्हेगार होतो ...ठार गुन्हेगार.....!!!

पप्पा धरतो पहिल्या पावलाच्या वेळी हाथ ....अगदी स्वताल लागत असताना काद्ठी आधाराला  ....स्साम्भालतो अद्खार्णारी पावलं आणि तीच पावलं आज चालतात ...गावेच्या गावे.... जिल्हे , राज्ये आणि मग उडतात देश देश !!!! तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा सांगतो सायकल स्वतच कशी शिकायची ते, सांभाळत हातातली काठी ......आणि जायचं अंधारातून स्वताच मार्ग शोधात .....! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा देतो हातात गाडी , हुशार माझ्हाय मुलीला ...शाळेत नको वेळ लागायला कि नको जायला अभ्यासातला वेळ म्हणून.....! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, उठवतो पडल्यावर गाडी शिकताना ...सांभाळत स्वताछाच तोल... आणि सांगतो पडलो तरी उठून कसे पुढ चालव ते.....!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, दाखवतो खुर्ची मला, म्हणतो कसा  केला सलाम मी या खुर्चीला आयुष्यभर ....दाखवशील  का बसून यावर  एकदा ?? आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, धरतो हातात दोरी अदृश्य आणि उड म्हणतो आकाश्यात या उंच !!!!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

औरंगाबादच्या सफरीमध्ये पप्पा , म्हणतो कसा मला ..... अशी कशी पडलीस म्हणून हिर्मुस्लीस तू.... केवढा रस्ता हा पडला समोर तुअझ्ह्या ...आकाश हे  तुझच ना?, मग का अशी अड्खालालीस तू.....!!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

अलार्म वाजतो पहाटेच आणि संवाद सुरु होतो  पप्पाचा .....!!आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पैसा कमावताना तो असावा समाधानाचा हे एकता एकता कळत कि ...... सगळी समधानाची पुंजी पाप्पाची गेली आपलं भविष्य घ्दावायला ..... !! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही...

स्वप्न, ध्येय, आणि शिखर दाखवता दाखवता ....आता पप्पा म्हणतो मला कसा कि हो आता स्थिर तुझ्हाय आयुष्यात ..... नाही बघवत हि धगधग आता तुझ्ही...!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

परवा परवा पर्यंत... हाथ धरून चालताना पप्पाचा ...मला वाटल कि मीच पाप्पाची काठी.....!

आणी काल तर ....सगळ कळून चुकलं ........

पायरी उतरताना घराची ....पप्पान दिला हाथ हाथात माझ्हाय , चार बोटांच्या घट्ट पकडीन समजल कि             " माझ्हाच अस्थिव उभ आहे या घट्ट आधारावर !!!!!"

                                                 




Saturday, 10 March 2012

DIPLOMA Final Year EXAM, ME & DRAVID !!!!!

(Date 9th march 2012 )  Lecture  झ्हाल्यानंतर  मी सहजच net surfing करायला आले आणि  live news मध्ये आलेली बातमी  "द्रविड declared his retirement !" , ओह !!! इंग्लंड दौर्यावर मारलेल्या ३ centuries आणि ऑस्सी दौर्यावर आले अपयश याच्या हि पलीकडे मला आठवायला लागली त्याची melbouren आणि कोलकत्त्याच्या  eden garden वरची laxman च्या  साथीची खेळी...त्याची ५ द्विशतके ......थकल्या भागल्या द्रविडची test cricket मधली दोन दोन दिवसांची खेळी.....खेल्ताखेलता डोक्यावरचे हेल्मेट काढून घामाचं धारांना वाट  करून देणारा द्रविड !!!  आणि  माझ द्रविडच्या खेळावरच  प्रेम !!! हे २०१२ च वर्ष्या आणि २००३ मधला गमतीदार प्रसंग (????)! तब्बल मी एकदम ९ वर्ष्ये मागे गेले............




             २००३  South Africa मध्ये झ्हालेला  "Cricket World cup "  Australia ने  India   दाणून हरवलं आणि सगळी झ्होप कशी खत्त  कन  उडाली. पुढच्या महिन्यातली Diploma Third Year (Final Year ) exam आणि माझ क्रिकेट प्रेम, या नंतर degree  admission च स्वप्न , ज्यावर आख्ख्याच्या   आख्खा भविष्य आहे आणि दुकानात पुस्तकच मिळाला नाही असा CONSTRUCTION MANAGEMENT विषय  !! या सगळ्या गोंधळात मला ३ दिवस अगोदर finally book भेटलं .... !
             On D Day ...!!  मी table वर ताटाची वाट पाहत शून्यात नजर ठेऊन बसले होते..... as usual शेवटचा paper म्हणून आईचा सूचनांचा भडीमार सुरु होता जो मी गेले पाच paper ऐकत होते.. आईन ताट पुढ ठेवलं Asusual सगळा आहार कसा हलका होता,,,जो तिन exam सुरु झ्हाल्यापासून maintain केला होता. मला तिच्या शब्दातला एकही शब्द कळत नव्हता ..... मला फक्त...पाहिलेला world cup , दुर्लक्ष्य केलेला CM                 ( CONSTRUCTION MANAGEMENT ) आणि finally आज त्याचा paper , १५ दिवसांपूर्वी  open केलेला CM चा syllabus ... पुस्तक market मध्ये   available नाही म्हणून चार दुकानावर टाक्लेक्या चक्रा, किती वेळा  त्या petrol pump वर  pocket money घालून पप्पांना न माहित होता घातलेले पेट्रोल हे सगळ आठवत होत, तरी सुद्धा ३ रात्री  आणि दोन दिवसामध्ये  फक्त १० तास झ्होप घेउन केलेल्या आभ्यासावर भिस्त ठेऊन  मी आज paper देणार या वर विश्वास ठेवत होते.
                         College च्या  entrance ला गेल्या गेल्याच काका (department puen ) म्हणाले " repeater नसल्यामुळे sitting arrangement change झहाली आहे. check करून घ्या!"
आईल्ल्ला !! या पापेरला कोणीच नापास होत नाही वाटत?.मी झ्हाले तर ?....छे ! हे काय ? सब मिट्टी मैं  मिल जाये गा ! Degree begree होईल कि नाही ? ..छे  ! काय हे भलताच सुचतय ?..
२.०५ ला वर्गात पोहोचले..... सारे कसे प्रस्सन्न होते..आणि बहुदा मीच  मरगळलेले !!
Answer-sheet तर केंव्हाच जागेवर पोहोचल्या होत्या. Thanks to god ! माझही जागा second last ...कोपरा....सही आणि  माझ्या मागे निखील !! नशीब !!  काही तरी मदत नाक्कीकारेल तो असे वाटले! जागेवर आसनस्थ होऊन मी details भरायला  सुरुवात केली .
" ज्योती!!" ............निखील   .
" बोल ! ओये माझह काही आभ्यास झहाला नाहीये...pls आज मला मदत कर ! निख्ल्या नाही म्हणून नको  !" ..  ... इति लगेच हळू आवजात  मी .
" ते जाऊ देत . तू आधी ऐक " ....निखील एकदम हळू हळू बोलत होता...
"ok ...२ min थांब.  माल आधी CPM आणि PERT चे  formule लिहू देत " मी
 एव्हाना Supervisor जवळ आला होता..... तो काहीबहि  निखील ला सूचना देऊन गेला ...पण मी मात्र त्यातली नाही असा आविर्भाव आणून line draw करत होते.
"पेन्सील "  अये थाथूर माथुर काही बाही सांगून त्याने बहुदा Supervisor ला कटवले असावे.
" ऐक ना?" ...पुन्हा निखील
"बोल" मी/....
" आग, काल द्रविडचा लग्न झ्हाल! तुला  माहित आहे का? मी phone करणार होतो तुला पण म्हटल तू तुझ्या गुहेत असशील!"....इति  निखील उवाच..
मी मान वर करून आधी supervisor कुठे आहे याचा वेध घेतला ( तो बिचारा दरवाज्याजवळ प्रश्नपत्रिका वाटायच्या होणार्या bel हि वाट पाहत होता) आणि मान १८० मध्ये वाक्ळून जळजळीत काताक्ष्या टाकून निखील ला म्हंटल...." अर्रे माणसा, final year चा  paper आहे, आभ्यास नाही आणि तुला येथे द्रविड  आठवतो आहे का? मला मदत कर २० मार्क्स ची बाकी २० च  मी manage करते!"
       Supervisor paper distribute करत आमच्या कडेच येत होता . मला तो bulldozer घेऊन येत असल्या सारखा वाटत होत. Question paper देतच त्यान final warning दिली कि " जर आता पुन्हा discuss करताना  दिसलात तर paper लिहायच्या आधीच काढून घेईन "
त्याला काय माहित आम्ही paper नाही तर द्रविड चा लग्न discuss करतोय ते ! बिचार्रा ! उगाचच energy घालून गेला.
पुध्ये २.५ तास निरव शांतते मध्ये पांढर्या उत्तरपत्रिकेवर नीला रंग पसरून टाकला. शेवटच्या १५ मिनिटात मला कळून चुकल होत कि आपला १०० मार्क्स चा पापर आता लिहून संपला आहे. मग मेंदू एकदम द्रविड कडे वळला ....मी थोडी मागे टेकून बसले आणि मान मागे करून विचारल  " तुला कसे कळले रे?"
बहुधा निखील चा  पण paper झ्हाला असावा..... थोडे पुढ्ये झ्हुकत तो म्हणाला " काल रात्री मेस मध्ये गेलो तेंव्हा टी व्ही वर news पहिली "
मग काय ...... एक्षम संपल्याची बेल झहाली आणि आम्ही द्रविड लग्नावर दिस्कुस करायला एकदम रिकामे.......क्लास रूम मधून आपापल्या ब्य्के कडे aalyavr लक्ष्यात आले कि आपला पापर होता आत्ता .... मग फोर्मालीत्य म्हणून ...जुजबी दोनचार vakya झहाली CM पापर वर.
                     अजून हि आठवतेय....... august मध्ये result आल्यावर पहिल्यांद आम्ही एकमेकांचे result हातात घेतले...." Congrtas for distinction !" एकमेकाला wish केल ......
मग काय,....नजर आणि हातच बोट मात्र CM ला शोधात होत....
" CM 80 ....... not bad , पण  मला वाटत जरा आणखी पडले असते.... !" ....निखील
" हो ! मला हि वाटत जरा आधी दोन दिवस open केला असता तर नक्कीच .....!"....मी
" नाही ,........आणखी पडले असते ...जर द्रविड न लग्न नसत केला तर !!".........निखील ..... आणि एकाच हश्या ..........!!!!!!
                          मला वाटत कि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात college life चं आठवणी या खोलवर रुतलेल्या असतात., जणू एखाद्या हत्तीच्या पायाचा ठसा चिखलात खोल रुतावा तश्या !!! माझ्या Diploma आणि Degree च्या आठवणी मध्ये हि घटना मी  कधीच  विसरू शकत नाही.... माझ्या आठवणीन मध्ये द्रविड न ऐक milestone च  सेट केला होता अगदी त्याच्या हटके  world record सारखा !  अभुदा जगात इतरांना क्रिकेट मुळे द्रविड आवडत असावा ..पण त्याच्या शास्त्रशुद्ध rich आणि संयमी खेळी मुळेच  मला टेस्ट क्रिकेट आवडायला लागले....आणि   आता  IPL पण नक्कीच आवडेल !!!!  तुज सम फक्त तूच द्रविड !!!!
       



 Dravid ,        we  will  miss  u ,to ur game...... to ur rich four..!                    
                                               to ur fielding,  to ur catches ....
                                               to ur cool temperament.....to ur determination.....
                                               to ur concentration ... to ur fighting  nature......!!!!
                                               u r simply great man !!!!!!! u r simply great WALL !!!!!!!!!
THE GREAT WALL OF INDIA !!!! We will miss u !!!!!



Tuesday, 14 February 2012

I THINK IT"S 14 FEB !! TODAY !!



लेखणी बराच वेळ घुत्माल्तेय   कागदावर......अगदी तशी जसे पहिल्यांदा चहा ला जाताना तुझ्हे शब्द घुत्माल्ले तुझ्याच

ओठात..आणि मग माझ्ह्याकडा टाकलेली एक नजर !!!! आणि सारी देवाण घेवाण..!!!  एक  अस्वस्थ ..बैचेन ..उदासीन

शी माझही हि सकाळ....!!! शून्यातली नजर , भरधाव  flashback  मध्ये पोहोचलेल माझ मन ! आणि  गेलेला  "केवढा

मोठ्ठा काळ" ?? असा  उभा ठाकलेला   प्रश्न..... माझ लक्ष्य ना या  शब्दाकडे ना त्या

सरलेल्या काळाकडे !!....                                                      

                          मी धावतेय पुन्हा त्याच रस्त्यावरून जिथे  तुझ्ही माझी पहिली  भेट झ्हाली, जिथ शब्दांची देवाणघेवाण 

झाली, एवड्या practical जगात  एक संवेदनशील जागा मिळाली . आज  इथून वावरताना सार  कस अपरिचित

वाटत  ...भकास, बह्यान , उजाडलेल्या जमिनीसारखी इथ कुठतरी काळी  भयाण कातळ वर यावा तशी !!.... 
                         
                       हा ओळखीचा रस्ता मला  शोधून सुद्धा कुठे ओळखीचा का वाटत  नाही?....पूर्वी इथे सार काही संवेदनशील 

वाटायचं ...अगदी एखाद्या निरागस , अबोल ,संवेदनशील  पण बरंच काही सांगून जाणार्या चेहऱ्यासार्ख !!!   ...कदाचित

माझ्याच बरोबर  सावली असायची एका अस्थित्वाची म्हणून   असेल?????  ..पण ते मला  तेंव्हा खरच समजायचं  नाही

आणि का समजला नाही समजा;ले माहित नाही ...पण थोडफार आज उमगतेय.!!  दव वाढत्या उन्न्हा बरोबर केंव्हाच

विरघळून गेला आत वातावरण केवढ  तप्त होतंय ...आणि मग मी , माझी नजर तो दव पुन्हा पुन्हा का शोध घेत बसतेय?

दूर दूर वर नुसतेच ढग दिसतात जवळ आल्यासारखे ....... आणि ते तसेच भासतात पण बरसत  मात्र नाहीत.  सार

कस रण रण  ते  वाटतय .... आज "कमावलं आणि गमावल्याच्या " हिशोबामध्ये  माझ्हे हाथ  का थरथरत आहेत?

हृहायात कसली कालवाकालव झ्हालीय.....??? एवढा आवंढा का आलाय?? श्वास पुन्हा अडखळला ...आणि विचारांचा

गुंता  का झ्हालय..... ?????? कितीश्या गोष्टी शिकवल्या या काळसर दगडी रस्त्याने... ... किती संयमाने माझ्ही

बकबक ...फुटकळ वाक्य .... बिन अर्थाचे शब्द एकले ....कदाचित  पुन्हा एक असतीत्व   होत  म्हणून ...आणि

तेवढ्याच संयमाने माझ्या मूर्ख प्रश्नांची समाधानकारक उत्तर  मिळाली .. ...किती सहज... !!!! केवढ सुरक्षित

वाटायचं  मला ?? का नाही समजू शकले हे  मी ..... ?????  मगआजच्या  दिवशी एवढा उदास होण्याचा तसा

अधिकारच नाही या मनाला.  किती वेडी  मी ???  जाणं होत कि ...कि कधी मी हाथ च दिला नाही ? ..???  हा

आक्रोश आहे कि आलेला मोठ्ठा हुंदका !! ... माझ्या मनाचा कि ...मनासारख्या  करत असणार्या

गोष्टींचा .....आणि गमावण्याच्या दुखाचा.... !!! कि आकाश कवेत घेण्याच्या इच्छेचा....????
       

                 छे छे ...काय काय चालू आहे भावनांनी आपल्य्वर एवद्झ उरलोड  व्हाव का??? आता ह्या भावना

आता  कल्पना पण रचायला  लागल्या का ?? कसले भास होतात हे ???? " ज्यानं मन  जग जिंकल , त्यान जग

जिंकलं """ हे शुक्राचार्याच साध जीवन तत्व विसाराव का ????? अजून आकाश भल मोठ्ठ पडलाय  ...ते बघ ते

वाट पाहताय.... ..... पुन्हा हाथ सावरावेत ..... पुन्हा माझ्याच तळव्यावर त्या भासमान  तळव्याचा स्पर्श

जाणवावा ,..... आणि जाणवाव कि तो स्पर्श केंव्हाच हवेत विरलाय.!!! ..सार काही स्वप्न ..... पुन्हा त्या हवेच्या

पड्याल्च ते खुलं अस्मान ..... किती मोठ्ठ..... ते बघतेय....माझ्या कडे ..पुकारतंय मला आणि बाहेर ये, या

आभासातून ....स्वताच्याच रचलेल्या कल्पनेतून..... कल्पनेतले इमले जणू oiyasis ,,,,,भासमान ,,,मृगजळाच

ते..!! इथे रचायचे आहेत स्वताच्या अस्तीवाचे मनोरे.... !! कसली आलीय भावना आणि कसले काय... सारा

मनाचा खेळ....!!! ...... आणि valentine day च्या दिवशी झ्हालेला साक्षात्कार ......
                  

                      " प्रेम " म्हणजे because of biological changes in our body,,.... because of effect of

hormons ... our mind is running behind some thoughts ....!!!!!! आणि मग तो "प्रेम " नावाचा खुळचट

शब्द !!
                
                       बहीण बाईंना याची उपरती खरचं चं झ्हाली होती ....पुढच्या पिढीला समजाव म्हणूनच का

लिहिली होती ती कविता...." मन वढाय वढाय ...उभ्या पिकाकडे धाव ......"